इंदापूर : राज्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून तयारी सुरु असून इच्छुकांकडून उमेदवारीसाठी दावे केले जात आहेत. महायुतीमध्ये राज्यातील अनेक जागांवरुन इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. अशातच आता इंदापूरच्या जागेवरुन महायुतीमध्ये तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या इंदापूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे हे असून या जागेवर भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांनीही दावा सांगितला आहे.
अजित पवारांच्या दत्तात्रय भरणे यांनी ज्या हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला. वरिष्ठ पातळीवरील राजकीय चर्क फिरल्यामुळे महायुतीमध्ये एकत्र आहेत. इंदापूरच्या जागेवर दोन्ही नेते इच्छुक असून मतदारसंघामध्ये काम करताना दिसत आहेत. अशातच हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे यांनी आता हर्षवर्धन पाटील हे १०० टक्के यावेळी इंदापूरमधून निवडणूक लढणार, असे सांगितले आहे.
“इंदापूरचा कार्यकर्ता आमचा श्वास आहे. अद्यापपर्यंत आम्ही कोणताही निर्णय घेतला नाही. ३ वेळा आमच्यावर अन्याय झाला. जागावाटपाचा निर्णय आतापर्यंत झालेला नाही. इंदापूर तालुका २०१४ पर्यंत प्रगतीपथावरचा होता. आता तालुका २० वर्षेमागे गेला आहे. या ठिकाणच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला. कोणताही विकास झालेला नाही. गुन्हेगारी वाढ झाली. हर्षवर्धन पाटील विधानसभा निवडणूक लढवणार १०० टक्के निश्चित. ते कसे लढतील यावर बोलणार नाही, पण आम्ही विधानसभा निवडणूक लढणार’ असं अंकिता पाटील ठाकरे यांनी म्हणाल्या आहेत.
दरम्यान, ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षासाठी ती जागा सोडायची असा महायुतीचा साधा फॉर्म्युला आहे. इंदापूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार असताना देखील भाजपने त्या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे आता महायुतीच्या फॉर्म्युल्याने उमेदवारी देण्यात येणार की भाजप या जागेवर लढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांनो सावधान! झिका व्हायरसने घेतला चौथा बळी; ‘या’ भागात जास्त धोका?
-Kasba Vidhansabha: मैदानात कोण उतरणार? भाजपसह काँग्रेस, शिवसेना, मनसेत इच्छुकांची भाऊगर्दी
-मनोज जरांगे विधानसभा लढवण्यावर ठाम; पुण्यातील सर्व मतदारसंघाचा घेतला आढावा