Natasa Stankovic : टीम इंडियाचा क्रिकेटर हार्दिक पांड्या हा आपल्या क्रिकेट क्षेत्रासह त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील अनेकदा चर्चेत आला आहे. हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्या या दोघांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सुरु होती. हार्दिक आणि नताशा त्यांच्या संसारात दुरावा आल्याचे बोलले जात आहे. त्यातच हार्दिक पांड्याची पत्नी नताशाने सिनेक्षेत्रापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
नताशाने सोशल मीडिया अकाउंटवरुन अडनाव हटवले आहे. तसेच सोशल मीडियावरुन हार्दिकसोबतचे सर्व फोटोही डिलीट केले आहेत. तसेच संपूर्ण आयपीएलमधून ती गायब आहे. त्यामुळे आता हार्दिक आणि नताशा लवकरच विभक्त होणार असल्याचे म्हटले जात आहे. हार्दिक पांड्या आणि नताशा हे दोघे २०२० मध्ये लग्नबंधनात अडकले आहेत. नताशाने गेल्या काही दिवसांत पांड्या हे आडनाव सोशल मीडियावरुन हटवले आहे.
View this post on Instagram
नताशा आणि हार्दिक लग्नाआधीच आई-बाबा बनले होते. लग्नानंतर नताशाने बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर राहिली. नताशाने मॉडेल, डान्सर आणि अभिनेत्री म्हणून काम केले आहे. नताशा स्टॅनकोविक ही जाहिराती आणि इंन्स्टाग्राम प्रमोशनच्या माध्यमातून चांगली कमाई करत असते. नताशाचे सध्या इंस्टाग्रामवर ४ मिलियनपेक्षा जास्त फोलोअर्स आहेत. नताशाची एकूण संपत्ती २० कोटींच्या आसपास आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune Hit & Run | विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ; आणखी २ गुन्हे दाखल करणार
-Health Update : कलिंगड, टरबूज खाल्ल्याने होतेय विषबाधा; खाण्यापूर्वी अशी घ्या काळजी
-दोनदा एफआयआर का? आरोपीला पिझ्झा का? अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली कारणे
-‘हो, त्या रात्री आमदार टिंगरे पोलीस स्टेशनमध्ये आले होते, पण…’; अमितेश कुमार यांनी दिली माहिती
-‘..म्हणून आरोपी वेदांत अग्रवालच्या रक्तचाचणी अहवाल महत्त्वाचा नाही’; अमितेश कुमार असं का म्हणाले?