Hardik & Natasa : भारतीय क्रिकेटकर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नतासा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून नताशा-हार्दिक यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. दोघांमधील वाद इतके टोकाला पोहोचले की, दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता हार्दिक पांड्याला आयपीएलमधून बाहेर पडल्याचा धक्का सहन करावा लागला आहे. पण आता रिपोर्ट्सनुसार, आताच्या घडीला हार्दिक खासगी आयुष्यात आणखी एका कठीण टप्प्यावर उभा आहे.
हार्दिक आणि नताशा यांनी अतिशय धूमधडाक्यात लग्न केलं मात्र, नताशा हार्दिकला घटस्फोट देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेने चांगलाच जोर धरला आहे. नताशा फक्त घटस्फोटाच घेणार नाही तर हार्दिकच्या संपत्तीमधील ७० टक्के स्वतःचा हक्क असल्याचा दावा देखील करणार असल्याचे बोलले जाते. मात्र या चर्चांवर अद्याप दोघांनीही कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.
पण जर असं झालं तर, हार्दिक याच्यासाठी मोठा झटका असणार नाही. हार्दिक पांड्याकडे तब्बल ९१ कोटी रुपयांची संपत्ती आहे. जर त्यातील ७० टक्के वाटा हा नताशाला द्यावा लागला तर, तिला ६३ कोटी द्यावे लागतील… अशी माहिती देखील समोर येत आहे. दरम्यान, एका मुलाखतीत हार्दिक याने मोठा खुलासा केला होता. ‘माझ्या नावावर कोणतीच संपत्ती नाही. मी सर्वकाही माझ्या आईच्या नावावर केले आहे. मी सर्वकाही माझ्या आईच्या नावावर केलं आहे. माझ्या कार देखील आईच्या नावावर आहेत. माझा काहीही भरोसा नाही. त्यामुळे मी स्वतःच्या नावावर काहीही करणार नाही. पुढे जाऊन ५० टक्के मला कोणाला द्यायचे नाहीत’, असे हार्दिक म्हणाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मलायका आरोराच्या ‘त्या’ कृत्यामुळे सर्वत्र होतंय कौतुक; सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल
-कल्याणीनगर अपघाताच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम; ‘माझ्या समोर ती मुलगी हवेत उडाली अन्…’
-Pune Hit & Run : ”ते’ पाप भाजपने केलंय, फडणवीसांची भूमिका संशयास्पद’; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
-“सुप्रिया सुळेंमुळेच सगळे शरद पवारांना सोडून जात आहेत, मी आणि धीरज शर्मादेखील…”
-“मी त्यांची माफी नाही तर त्यांना दंडवत घालीन त्यांच्या पाया पडेल, पण फक्त…”-रवींद्र धंगेकर