पुणे : येत्या विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत राजकीय पक्षांकडून जय्यत तयारी सुरु आहे. त्यातच महायुतीकडून शिवसेनेचा शिंदे गट पुण्यातील एकाही जागेवर न लढता जिल्ह्यातील भोर आणि पुरंदरच्या जागेवरुन निवडणूक लढणार आहे. पुण्यातील ३ जागांवर दावा करणाऱ्या शिवसेने शहरातील ८ पैकी एकही मतदारसंघातून लढणार नसल्याची महिती मिळताच शिंदे गटाचे हडपसरमधून लढण्यासाठी इच्छुक असणारे शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेने पुण्यातील आठही जागांवरील दावा सोडला असे काहीही नाही. शिवसेनेला पुण्यातील ८ पैकी ३ जागा मिळाव्या. त्यामध्ये हडपसर, खडकवासला आणि वडगाव शेरी या ३ मतदारसंघाची मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. शेवटपर्यंत आम्हा शिवसेनेचा दावा या तिन्ही मतदारसंघावर कायम राहिल, असे म्हणत नाना भानगिरे यांनी हडपसमधून लढण्याचं निश्चित सांगितलं आहे.
पुण्यातील जागांवरील दावा सोडण्याबाबत अशी कोणतीही बैठक झाली नसावी. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही खडकवासला, हडपसर आणि वडगाव शेरीबाबत दावा कायम राहिल. महायुतीमध्ये शेवटी जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल, असेही नाना भानगिरे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-अजितदादांना धक्का देण्याची तयारी; सुप्रिया सुळेंच्या गाडीत तोंड लपवणारा ‘तो’ नेता कोण?
-पिंपरीत झळकले गुलाबी बॅनर्स; अण्णा बनसोडेंच्या बॅनर्सची राजकीय वर्तुळात चर्चा
-शिवसेनेच्या शिंदेंच्या गटाची पुण्यातून माघार, पण ‘या’ जागांवरुन लढणारच!
-जय शंभू महादेवा! बिग बॉस विजेता सुरज चव्हाण घरी जाण्याआधी पोहचला जेजुरी गडावर
-कार्यकर्त्यांनी केली उमेदवारीची मागणी; अजितदादा म्हणाले, ‘इथं मी मंत्री असून…’