पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठका सध्या मुंबईमध्ये सुरु आहेत. महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीचं देखील ‘ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार ती जागा त्याची’ अशा सूत्रावर जागांचे वाटप होत असल्याचे सांगण्यात येत आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघ हा ठाकरे गटाला मिळाला असून या मतदारसंघातून थेट माजी आमदार महादेव बाबर यांची उमेदवारी जाहीर केल्याचे समोर आले आहे. यावरुन आता महाविकास आघाडीमध्ये वादाची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) पक्षाने हडपसर, पर्वती, वडगाव शेरी आणि खडकवासला या जागांवर प्रामुख्याने दावा सांगितला आहे. तर दुसरीकडे शिवसेनाठाकरे गट हडपसर, वडगाव शेरी, कोथरूड, खडकवासला या जागा आपल्या वाटेला यावेत, यासाठी प्रयत्न करत आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे उमेदवार म्हणून इच्छुक आहेत. त्यामुळे ही जागा राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष जोरदार प्रयत्न करत आहेत. आणि अशातच सुषमा अंधारेंनी मास्टरस्ट्रोक देत हडपसरमधून थेट शिवसेनेचा उमेदवार जाहीर केला आहे.
‘महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये कोणताही मनमुठाव नाही सर्वच जागांवरती आता एकमत होत आले आहे. हडपसरची जागा देखील क्लिअर झाली असून फक्त पंधरा ते अठरा जागांवरती आता चर्चा सुरू आहे. हडपसर मतदारसंघ आम्हाला सुटला असून या मतदारसंघातून माजी आमदार महादेव बाबर हे उमेदवार असतील’, अशी घोषणा सुषमा अंधारे यांनी केली आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये आगामी काळात मोठा संघर्ष पाहायला मिळू शकतो.
महत्वाच्या बातम्या-
-पक्षप्रवेश करताच हर्षवर्धन पाटलांनी सुप्रिया सुळेंना केली ‘ही’ विनंती
-हर्षवर्धन पाटलांचा पक्षप्रवेश होताच जयंत पाटलांनी केली ‘ही’ मोठी घोषणा
-अजित पवार बारामतीमधून लढणार नाहीत! कोणत्या मतदारसंघाकडे वळवला मोर्चा?
-वडगाव शेरीवरुन आघाडीत बिघाडीची शक्यता; भुजबळ म्हणाले, ‘शिवसेनेला हा मतदारसंघ सोडला तर…’