पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोविंद देवगिरी महाराज यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. ‘हिंदुत्ववादी सरकार आहे, म्हणून समाज आणि देश सुरक्षित आहे. माविआ सत्तेत येईल का नाही माहिती नाही ते येणारच नाही, जरी आले तरी मंदिर, जागा प्रश्न आला तर आम्ही एकत्रित येऊन धार्मीक पद्धतीने विरोध करू’, असे गोविंद देवगिरी महाराज पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.
‘निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असं येणं आमचा स्वभाव नाही, पण यावेळी असं करावं असं वाटलं. छत्रपती शिवाजी महाराज याची कथा धार्मीक व्यासपीठावरून सुरू आहे. महाराजांच्या जीवनाचे विचार सगळीकडे आहे. देश समर्थ झाला पाहिजे, यासाठी लोकांनी आपली भूमिका बजावली पाहिजे’, असे गोविंद देवगिरी महाराज म्हणाले आहेत.
‘हिंदू मतदान गेले काही दिवस कमी झालं आहे. 100 टक्के हिंदू मतदान केलं पाहिजे, विशिष्ट समाज मतदान चांगला टक्के करतो, बाहेरच्या देशातून लोक मतदान करायला येतात, यात हिंदू कमी पडत आहे, त्यांना जागरूक करण्यासाठी आलो आहे. मुस्लिम समाज मागण्या करतो, काही पक्ष मान्य करतात, मी मुस्लिम विरोधी नाही, माझ्या गावात आम्ही एकोप्याने राहतो, सगळे मुस्लिम असे नाहीत. पण, काहीजण यात नविन आले आहे. त्यामुळे ते व्यत्यय आणतात’, असे मत यावेळी गोविंद देवगिरी महाराज यांनी व्यक्त केले आहे.
‘बंटेंगे तो कटेंगे’ याचा सरळ अर्थ त्याच्या पक्षाला मतदान करा, हिंदू मत कमी झाले तर तुमचा पराभव होईल. आम्ही राष्ट्राची बात करत आहोत, धर्माची बात करत नाही. मुस्लिम धर्मगुरू फतवा काढून एका विशिष्ट पक्षाला आणि आघाडीला मतदान करा असं सांगत आहेत, असं करणं योग्य नाही, मग आम्हालाही एकत्रित येऊन काम करावं लागलं आहे. अन्याय होत असेल तर कोर्टात न जाता त्याच्या कोर्टात जातात. जिथं हिदू संपत्ती धोका आहे, हिंदू विरोधी वातावरण निर्माण करत असेल तर मी कोणाच्या मागे जावा असं म्हणणार नाही, पण शिवाजी महाराज यांच्या जीवनमूल्यानुसार जे वागत असतील त्यांच्या मागे जावे असं आवहान करत आहे”, असे गोविंद देवगिरी महाराज म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-“माझ्या वडिलांचा फोटो लावायचा नाही, तुझ्या त्या…”, शरद पवारांचा फोटो वापरल्याने सुळे आक्रमक
-“बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल”
-“देश विश्वगुरु झाला पाहिजे या विचाराने भाजपचे काम”- नितीन गडकरी
-पर्वती मतदारसंघासाठी ‘विकासाची दशसूत्री’ ठरणार दिशादर्शक- आबा बागुल
-“लोकसभेला आडाकडं बघितलं, आता विधानसभेला विहिरीकडं बघा म्हणजे…”- अजित पवार