पुणे : युपीएससीची (केंद्रीय लोकसेवा आयोग) पूजा खेडकरने दिव्यांग असल्याचे सांगत फसवणूक केली. त्यानंतर आता राज्यातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय, निमशासकीय नोकरी मिळवलेल्यांची संख्या आता मोठी असल्याचे समोर आले आहे. आमदार बच्चू कडू यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोध अभियान १९ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत राबवण्यात आले.
यावेळी या अभियानातून शासकीय, निमशासकीय सेवेत दाखल झालेल्यांची यादी तयार झाली. ही यादी कडू यांनी ही यादी कडू यांनी दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी यांना सादर केली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही त्याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.
या अभियानातून तयार झालेल्या यादीमघ्ये ४५० जणांचा समावेश आहे. त्यामुळे संबंधितांच्या दिव्यांगत्व, दिव्यांग प्रमाणपत्राची पुनर्पडताळणी करून बोगस दिव्यांग असल्यास त्यांना बडतर्फ करावे. त्यांच्या जागी प्रतीक्षा यादीतील दिव्यांग उमेदवारांची नियुक्ती करावी. त्याचप्रमाणे बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या शासकीय यंत्रणेतील संबंधितांवर कारवाई करून गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.
गेल्या १५ वर्षांत शासकीय निमशासकीय सेवेत असलेल्या दिव्यांगांचीही फेर वैद्यकीय तपासणी करून बोगस दिव्यांग असल्यास त्यांच्यावरही कारवाई करावी. बोगस दिव्यांग प्रमाणपत्रामुळे खऱ्या दिव्यांगांवर अन्याय होत आहे. त्यामुळे जात पडताळणी समितीच्या धर्तीवर दिव्यांग पडताळणी समिती स्थापन करण्याची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनामध्ये बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-स्वातंत्र्यदिनापूर्वी दिल्ली पोलिसांकडून मोस्ट वाँटेड दहशतवादी रिझवानला अटक; पुण्याशी होता संबंध