पुणे : मोदी सरकारचा अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. या अर्थसंकल्पातून अनेक विविध योजनांची घोषणा केली. तर देशात काय महागणार आणि काय स्वस्त होणार याबाबत तरतुदी करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पामध्ये नोकदार वर्गासाठी गुड न्यूज आहे. आता जे १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न घेतात ते आता करमुक्त असणार आहेत.
आतापर्यंत ७ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना कर भरावा लागत नव्हता. ज्यांचे उत्पन्न हे ७ लाख रुपयांपर्यंत आहे ते करमुक्त होते. ७ लाख पेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना उत्पन्न कर भरावा लागत होता. मात्र आता उत्पन्न १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना आता उत्पन्न कर भरावा लागणार नाही.
‘कर’रचनेतील बदल
– 18 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 70 हजार रुपयांची सूट
– शून्य ते चार लाखापर्यंत शून्य टक्के कर
– चार ते आठ लाखापर्यंत 5 टक्के कर
– 8 ते 12 लाखाप्रयंत 10 टक्के कर
– 12 ते 16 लाखापर्यंत 16 टक्के कर
– 16 ते 20 लाखापर्यंत 20 टक्के कर
– 20 ते 24 लाखापर्यंत 25 टक्के कर
तसेच, TCS मध्येही सवलत देण्यात आली असून ज्येष्ठ नागरिकांनाही प्राप्तिकराच्या मोठी सवलत मिळाला आहे. पण हा फायदा फक्त त्या करदात्यांनाच मिळेल जे नवीन कर प्रणालीनुसार आयटीआर दाखल करतील. १८ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना ७०,००० रुपये वाचतील तर, २५ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्यांना १.१० लाख रुपये वाचतील. आयटीआर आणि टीडीएसची मर्यादा वाढवण्यात आली आहे. टीडीएसची मर्यादा १० लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
– नवीन आयकर प्रणाली सुटसुटीत असणार
– मध्यवर्गींच्या उत्पादनात वाढ होणार
– ज्येष्ठ नागरिकांना टीडीएस मर्यादा एक लाखापर्यंत नेणार
– आयकर भरण्याची मुदत चार वर्षांपर्यंत वाढवली
– चार वर्षांपर्यंत अपडेटेड टॅक्स रिटर्न भर शकणार
– आयकरात दंड देण्यापेक्षा न्याय देणार
– अर्थसंकल्प 2025-26 साठी सुधारित अंदाज खालीलएकूण उत्पन्न
– 34.96 लाख कोटीकर उत्पन्न
– 28.87 लाख कोटीवित्तीय तुटीचा अंदाज
-जीडीपीच्यी 4.4 टक्के
महत्वाच्या बातम्या-
-केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकारने शेतकऱ्यासाठी काय घोषणा केल्या?
-पीएनजी ज्वेलर्सतर्फे दगडूशेठ गणपती चरणी १ किलोचा ‘कमळ हार’ अर्पण
-पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलवरुन ८ फेब्रुवारीपासून ‘डिजीयात्रा’ सेवा!
-पुण्यात राज ठाकरे अन् एकनाथ शिंदेंची बंद दाराआड चर्चा; नेमकं काय घडलं?
-गणेश जयंतीनिमित्त कोणते रस्ते बंद, कोणते पर्यायी मार्ग, वाचा एका क्लिकवर…