मुंबई | पुणे : दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी भक्त विठुराया नामाचा करत पंढरपूरच्या दिशेने पायी वारी करत असतात. या वारी दरम्यान वारकरी ऊन, वारा, पाऊस काहीही न पाहता हरिनामाचा गजरात भक्तीमय वातावरणात विठुरायाच्या भेटीसाठी जात असतात. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आषाढी एकादशीनिमित्त अनेक पालख्या पंढरीच्या दिशेने जात आहेत. याच माऊलीच्या भक्तीमध्ये न्हाऊन निघालेल्या, विठुरायाच्या नामघोषात तल्लीन झालेल्या वारकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे.
राज्यभरातून पंढरीची वारी करणाऱ्या वारकऱ्यांना आता सरकारने पेन्शन देण्याचा मोठा निर्यण घेतला आहे. परंपरेने महिन्याची वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धापकाळात वारकरी पेन्शन मिळणार आहे. या योजनेमुळे राज्यभरातील लाखो वारकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळच्या वतीने शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
वारकरी महामंडळाचे मुख्यालय हे पंढरपूरमध्ये असणार आहे. प्रशासकीय सेवेतील अधिकारी किंवा निवृत्त अधिकाऱ्यांची महामंडळावरती व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. तसेच, महामंडळाचे भाग भांडवल ५० कोटी इतक असणार आहे. कीर्तनकारांना आरोग्य विमा कवचही राज्य शासनाकडून दिले जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवारांच्या लाडकी बहिण योजनेबाबतच ‘ते’ वक्तव्य ठरु शकतं विधानसभेसाठी धोक्याचं!
-महाराष्ट्र सरकार उचलणार तीर्थ दर्शनाचा खर्च; ज्येष्ठांसाठी काढली ‘ही’ नवी योजना
-पुणेकरांनो काळजी घ्या! झिका व्हायरस पसरतोय, डेंग्यूची रुग्णसंख्याही झपाट्याने वाढतेय
-पुणेकरांनो सावधान! झिका वाढतोय, शहरात रुग्णांचा आकडा १९ वर; वाचा सर्वात जास्त धोका कोणत्या भागात?
-राज्यात पुढील ५ दिवस ‘या’ भागात सर्वाधिक पाऊस; अनेक भागात ऑरेन्ज, यलो अलर्ट जारी