पुणे : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंंडळातर्फे (MHADA) पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएमध्ये विविध गृहनिर्माण योजनेतील 6 हजार 294 सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन सोडत जाहीर करण्यात आली आहे. म्हाडाच्या या प्रकल्पासाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ गुरुवार आज दिनांक 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याहस्ते आज ‘गो – लाईव्ह’ कार्यक्रमांतर्गत करण्यात आला.
पुणे मंडळातर्फे सदनिका (Home) विक्रीसाठी ऑनलाईन संगणकीय सोडत 5 डिसेंबर, 2024 रोजी काढण्यात येणार आहे.आज 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. नोंदणीकृत अर्जदार आज दुपारी 12 वाजेपासूनच ऑनलाइन पेमेंट देखील करू शकणार आहेत. तसेच ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रिया दिनांक 12 नोव्हेंबर, 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता संपुष्टात येणार आहे. 12 नोव्हेंबर, रोजी रात्री 11.59 पर्यन्त अर्जदार ऑनलाइन अनामत रक्कमेच भरणा करून शकणार आहेत.
पुण्यातील म्हाडा सोडतीसाठी 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर केली जाणार आहे. अर्ज नोंदणी व अर्ज भरणा करण्याआधी या माहिती पुस्तिकेचे अवलोकन करावे. ही पुस्तिका https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर इच्छूक अर्जदारांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे आवाहन मंडळातर्फे इच्छुक अर्जदारांना करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ऐन विधानसभेच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; संजय काकडे घेणार हाती ‘तुतारी’
-जुन्नर विधानसभेत मोठा ट्विस्ट! राष्ट्रवादी नेत्याच्या मुलाखतीत अचानक पोहचला काँग्रेस नेता