पुणे : राज्य सरकारने महिलांच्या सबलीकरण सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिलांसाठी सुरू केली आहे. आतापर्यंत राज्य सरकारने या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना ६ हफ्त्याची रक्कम प्रति महिना १५०० असे एकूण 9 हजार रुपये दिले आहेत. सहावा हफ्ता डिसेंबर महिन्यात २५ ते ३० या दरम्यान देण्यात आला. आता जानेवारी महिन्याचा हफ्ता कधी जमा होणार? असा प्रश्न महिलांना पडला होता. यावर आता महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.
जानेवारी महिन्याचा हफ्ता कधी जमा होणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेतील सर्व पात्र महिलांना २६ जानेवारी २०२५ पर्यंत लाभ हस्तांतरण होणार आहे. यासाठी राज्य मंत्रिमंडळाने ३६९० कोटी रुपयांच्या निधीस मान्यताही दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे, असं अदिती तटकरे म्हणाल्या आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना !
योजनेतील सर्व पात्र महिलांना २६ जानेवारी २०२५ पर्यंत लाभ हस्तांतरण होणार आहे. यासाठी राज्य मंत्रिमंडळाने ३६९० कोटी रुपयांच्या निधीस मान्यताही दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे.… pic.twitter.com/VTliTm6vTt
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) January 16, 2025
“मला सर्व लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की दर महिन्याला आपण महिना संपवायच्या आधी या योजनेचा लाभ देत असतो. आता जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात २६ जानेवारीच्या आधी करण्यात येणार आहे. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार आम्ही या महिन्याच्या वितरणाला सुरुवात करणार आहोत”, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.
१५०० की २१०० रुपये जमा होणार?
“याबाबत आम्ही आधीही अनेकदा स्पष्टीकरण दिलेलं आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्पष्टीकरण दिलेलं आहे. नवीन अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याबाबतचा सकारात्मक विचार करण्यात येईल. मात्र, सध्या तरी लाडक्या बहिणींना १५०० रुपयांचा लाभ आपण देणार आहोत”, असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजितदादांच्या बालेकिल्ल्यात नवा ट्विस्ट; बड्या नेत्यांची होणार घरवापसी
-किरीट सोमय्यांचा मोठा दावा; ‘…तेव्हा वाल्मिक कराड सुप्रिया सुळेंसोबत होता’
-पुण्यात कंटेनरचा थरार; भरधाव वेगाने पोलिसांच्या गाडीसकट २०-२५ गाड्या उडवल्या
-कृषी मंत्र्यांकडून पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख; अजित पवार म्हणाले, ‘अरे तो पहाटेचा…’
-‘राजकीय आश्रय, मर्जीतले प्रशासन अन्…’; बीडच्या गुन्हेगारीवरुन शरद पवारांच्या आमदाराचा गंभीर आरोप