दिल्ली | पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अनेकांसाठी योजना जाहीर केल्या आहेत. त्यातच सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. सोने तब्बल ७३ हजारांवर पोहचले होते. त्यामुळे अनेकांचे या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले होते. अखेर देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी अर्थसंकल्पामध्ये सोने, चांदीचे दर कमी करण्याची घोषणा केली आहे.
- सोने व चांदीवरील सीमाशुल्क ६ टक्क्यांनी कमी करण्यात आलं आहे, तर प्लॅटिनमवरील सीमाशुल्कात ६.४ टक्के घट करण्यात आली आहे.
- अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोबाईल फोन व चार्जरवरील कस्टम ड्युटी (सीमाशुल्क) १५ टक्क्यांनी कमी करत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता मोबाईल फोन व चार्जर्स स्वस्त होतील.
- कर्करोगावरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या तीन प्रमुख औषधांना सीमाशुल्कातून सूट देण्यात आली आहे.
सोलार पॅनेलची निर्मिती करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही वस्तूंना सीमाशुल्कातून सूट देण्याचा प्रस्तावही अर्थमंत्र्यांनी यावेळी मांडला. - फोन व इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या लिथियन-आयॉन बॅटरीवरील कर कमी करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
- ई-कॉमर्सवरील टीडीएस रेट १ टक्क्यावरून ०.१ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे.
- फेरॉनिकेल, ब्लिस्टर कॉपरवरील बेसिक कस्टम ड्युटी हटवण्यात आली आहे.
- चामड्यापासून बनवलेल्या वस्तू देखील स्वस्त होणार आहेत.
- २५ महत्त्वाची खनिजे सीमाशुल्कातून वगळण्यात आली आहेत.
- माशांच्या खाद्यावरील सीमाशुल्क ५ टक्क्यांनी कमी केलं आहे.
सोनं-चांदीच्या दरातही मोठी कपात होणार असल्याचे निर्मला सितारमन यांनी अर्थसंकल्पामध्ये सांगितले आहे. या अर्थसंकल्पातून त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. अर्थसंकल्पामध्ये सोने, चांदीच्या भावात बदल करताच पुण्याच्या सराफ बाजारात याचा परिणाम दिसून आला.
महत्वाच्या बातम्या-
-ससून रुग्णालयातील आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर; डॉक्टरांनीच रुग्णांना…
-पुणेकरांनो, गुरवारी ‘या’ भागात पाणीपुरवठा बंद राहणार
-हिम्मत असेल तर शरद पवारांनी….; अमित शहांनंतर आता पुणे भाजपचं शरद पवारांना ओपन चॅलेंज
-‘तो’ कॉल मोरेंच्याच जवळील व्यक्तीने केला नाही ना? वसंत मोरे धमकी प्रकरणाला नवीन वळण
-पर्वतीत महाआरोग्य शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद; तपासणी करून घेण्यासाठी भर पावसातही नागरिकांची गर्दी