पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या एका सहाय्यक आयुक्तांना तिसऱ्या अपत्य जन्माला घालणं चांगलंच महागात पडलं आहे. या आयुक्तांना आता नोकरीपासून मुकावे लागले आहे. पालिकेचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांच्यावर महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली आहे. श्रीनिवास दांगट हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या दिव्यांग कक्षाचे सहाय्यक आयुक्त पदावर रुजू होते. मात्र, तिसरे अपत्य जन्माला घातल्यामुळे त्यांना नोकरीपासून मुकावे लागले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या १ जुलै २००५ च्या परिपत्रकानुसार २८ मार्च २००६ व त्यानंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक असल्यास संबंधित उमेदवाराचा नेमणुकी करता विचार केला जाणार नाही. १०० रूपयाच्या स्टॅम्पवर नोटराईज केलेले अपत्याबाबतचे प्रतिज्ञापत्र नियुक्तीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. मात्र, सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांनी रूजू होताना तसे प्रतिज्ञापत्र सादर केले नव्हते. त्यांच्यासंदर्भात तक्रार मिळाल्यानंतर दांगट यांची चौकशी करण्यात आली होती.
दांगट यांची चौकशी केल्यानंतर त्यांना २ पेक्षा अधिक अपत्य असल्याने त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली आणि या चौकशीमध्ये ते दोषी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दांगट यांना महापालिका सेवेतून कमी करण्याचे मंगळवारी आदेश काढले.
महत्वाच्या बातम्या-
-दोघेही एकाच कंपनीत कामाला, त्याने तिला भर रस्त्यात अडवलं अन्…पुण्यातील धक्कादायक घटना
-‘गुंडांनो, पुणे शहर सोडा अन्यथा तुमच्या ७ पिढ्या…’; पोलीस आयुक्तांचा सज्जड दम
-अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘कौटुंबिक विषय…’
-HMPV व्हायरसवर उपचार कसे करायचे? पालिकेच्या आरोग्य अधिकारी बोराडेंनी दिली महत्वाची माहिती