पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे दौऱ्यावर असताना पुण्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी शहरातील रखडलेल्या प्रकल्पांना मार्गी लावण्यासाठी निधी देण्याची मागणी केली आहे. शहरातील समान पाणीपुरवठा, मेट्रोचे विस्तारीकरण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी तसेच अन्य रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पुण्याला निधी द्यावा, यासाठी केंद्र तसेच, राज्याच्या अर्थसंकल्पात २ हजार कोटींची तरतूद करावी’, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी केली अर्थमंत्री अजित पवारांकडे केली आहे.
‘शहरातील अनेक प्रकल्प निधी अभावी रखडले आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात केंद्र सरकारकडून फक्त पुणे शहरासाठी म्हणून जवाहरलाल नेहरू एकात्मिक शहरविकास योजनेतून अडीच हजार कोटी रुपयांची तरतूद झाली. राज्य सरकारने ५०० कोटी रुपये दिले. या ३ हजार कोटी रुपयांमधून शहरातील अनेक प्रकल्प मार्गी लागले. शहरात समान पाणीपुरवठा योजना, नदीसुधार, मेट्रोचे विस्तारित मार्ग अशा योजना रखडल्या आहेत, असं म्हणत मोहन जोशी यांनी या गोष्टी अजित पवारांना सांगितल्या आहेत.
काँग्रेस नेते आपल्या मागणीचे निवेदन जोशी यांनी पवार यांना दिले. त्यानंतर तातडीने पवार यांनी संबधित अधिकाऱ्यांना फोन करून रखडलेल्या प्रकल्पांची माहिती घेत सूचना केल्या. या वेळी काँग्रेसचे दत्ता बहिरट, प्रशांत सुरसे, चेतन अगरवाल, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे, सुरेश कांबळे उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
-बारामतीत पवार काका-पुतणे एकाच मंचावर; राजकीय घडामोडीकडे राज्याचं लक्ष
-‘मावळ पॅटर्न’ला प्रदेश भाजपचा छुपा पाठिंबा होता?; बावनकुळेंनी केला मोठा खुलासा
-‘HMPV’ची जगाला धास्ती; पुण्यात मात्र आधीपासूनच होतेय व्हायरसची लागण