पुणे : पुणे शहरात महिला अत्याचार, अल्पवयीन मुले, मुलींवर होणारे लैंगिक अत्याचाराचे प्रमाण आता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कर्वेनगरमधील शाळकरी मुलांवर एका डान्स टीचरकडून लैंगिक अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. बुधवारी नाताळाच्या दिवशी मावळ तालुक्यातील लोहगड विसापूर किल्ला परिसरामध्ये एका खाकी वर्दीतील नराधमाने अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
कामावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने ५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत चॉकलेटचे आमिष दाखवत आडबाजूला घेऊन जात तिच्यासोबत दारूच्या नशेमध्ये अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी त्या मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर पोक्सो, ॲट्रासिटी आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे त्याचे निलंबनही करण्यात आले आहे. बुधवारी रात्री उशिरा लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायने हे या घटनेचा तपास करत आहेत.
खाकी वर्दीतील पोलीस कर्मचाऱ्याने केलेल्या या कृत्याने सर्व स्तरातून संतापाची लाट उसळली आहे. ज्याला जनतेचा रक्षक समजतो तोच भक्षक बनला तर न्याय मागायचा कोणाकडे?, असा संताप पीडित मुलीच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. सदर पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी आला म्हणून त्याला माणुसकीच्या नात्याने जेवायला दिले. पोलीस विभागाने आम्हाला न्याय मिळवून द्यावा. विकृत मानसिकता असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मुलाच्या वयाच्या अक्षयसोबत मोहिनीचे प्रेमप्रकरण; पती सतीश वाघचा काढला काटा
-सतीश वाघ यांची प्रेम प्रकरणातून हत्या; पत्नी मोहिनीनेच दिली होती सुपारी
-लाडक्या बहिणींना नववर्षाआधीच राज्य सरकारकडून गिफ्ट; सहावा हफ्ता आजपासून होणार जमा
-शिवाजीनगर बस स्टॅन्डचा होणार कायापालट; अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
-पुण्याच्या विकासात भर; अजित पवारांची अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक