पुणे : पुण्यातील येरवडा भागातील पुणे-नगर रोडवरील शास्त्रीनगर चौकात सिग्नलवर भर रस्त्यात गाडी उभी करुन गौरव आहुजा या तरुणाने अश्लील चाळे केले. या प्रकरणी गौरव आहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश ओसवाल या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी आता महत्वाची अपडेट समोर आली आहे. गौरव आहुजाला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गौरव अहुजाची रवानगी येरवडा जेलमध्ये होणार असल्याची माहिती मिळत आहे. गौरव आहुजाला जमीन मिळावा यासाठी त्याच्या वकिलाने न्यायालयाकडे जमीन अर्ज दाखल केला असून उद्या दुपारी या संदर्भात सुनावणी होणार आहे. आज सरकारी वकीलांनी न्यायालयाकडे आरोपी गौरव आहुजाची न्यायालयीन कोठडीची मागणी केली आहे.
गौरव आहुजाने अश्लील चाळे करताना त्याच्याकडे बीएमडब्लू ही अलिशान गाडी होती ती आता जप्त करण्यात आली आहे. गाडीची तपासणी करायची आहे. अमली पदार्थ घेतले होते का याबाबत तपास करायचा आहे. आरोपीने गाडी कोल्हापूर मध्ये गाडी लावली होती तो कर्नाटकला जाणार होता त्याबाबतचा तपास करायचा आहे. त्याने गाडी लावले तिथलं सीसीटीव्ही फूटेज घ्यायचे आहेत. त्यामुळे आरोपीला पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे केली आहे.
BMW काल जप्त केली आहे मग अमली पदार्थबाबत चौकशी काल का केली नाही? विनाकारण वेगवेगळी कारण सांगून पोलीस कोठडी मागितली जात आहे. गाडीमध्ये अमली पदार्थ अंश आहेत का? याची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी ३ दिवसांची पोलीस कोठडी मागितली. हा तपास करण्यासाठी आरोपीची गरज नाही. आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आम्ही जामिनासाठी अर्ज केला आहे, उद्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे, अशी प्रतिक्रीया आरोपी गौरव आहुजाचे वकील सुरेंद्र आपुणे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘धंगेकर पुण्याचे वाल्मिक कराड’; काँग्रेस नेत्याची धंगेरकरांवर टीकेची झोड
-मेट्रो मार्गावर आंदोलनाचा मुख्य सूत्रधाराचा शोध सुरु, न्यायालयात नेमकं काय झालं?
-पुण्यात होणार दोन मेट्रो मार्गिकेचा विस्तार; राज्याने पाठवला तब्बल एवढ्या कोटींच्या निधीचा प्रस्ताव
-लाडक्या बहिणींसाठी आणखी ३६ हजार कोटींची तरतूद पण तरीही २१०० रुपये नाहीच
-आधी म्हणायचे मी काँग्रेसचा हिरो, आता धरली शिंदे सेनेची वाट; रवींद्र धंगेकर चौथ्यांदा पक्ष बदलणार