पुणे : पुण्यातील येरवडा भागातील पुणे-नगर रोडवरील शास्त्रीनगर चौकात सिग्नलवर भर रस्त्यात आपली BMW अलिशान गाडी उभी करुन या तरुणाने लघुशंका केली त्यानंतर त्याने अश्लील चाळे केल्याचा घृणास्पद प्रकार काल समोर आला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश ओसवाल या दोघांना पोलिसांनी अटक केली. गौरव आहुजाने व्हायरल व्हिडीओनंतर माफी मागत गयावया करणारा व्हिडीओ पोस्ट केला. त्यानंतरही त्यांच्या मित्रांचा माज कायम असल्याचे पहायला मिळाले आहे.
गौरव आहुजा अश्लील चाळे करत असताना त्याच्यासोबत कारमध्ये भाग्येश अग्रवाल हा होता. व्हायरल व्हिडिओमध्ये भाग्येश अग्रवालने दारूची बाटली असल्याचे दिसत आहे. कारमध्ये असलेल्या भाग्येश ओसवाल या तरूणासह अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव आहुजा याला देखील पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या भाग्येश अग्रवाल या तरूणाला रात्री पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्यांच्यासाठी एका बॉक्समध्ये खाण्यासाठी पार्सल मागवलं होतं अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
भाग्येश अग्रवाल आणि गौरव आहुजा या दोघांसाठी त्याच्या मित्रांनी पाठवलेल्या बॉक्समध्ये त्या बॉक्समध्ये कोल्ड कॉफी ,बर्गर, कोल्ड्रिंक्स घेऊन आले होते. मात्र, त्या ठिकाणी माध्यम समूहाचे कॅमेरे असल्याने पोलिसांनी त्यांना हाकलावून लावलं. तो पार्सल घेऊन आलेला तरूण पुन्हा पोलीसांनी हाकलावून लावल्यानंतर ते पार्सल घेऊन परत जाताना व्हिडिओमध्ये दिसतो आहे.
कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला देखील येरवडा पोलीस स्टेशनमध्ये आणलं होतं. त्या अल्पवयीन आरोपीला देखील अटक केली त्याच रात्र पिझ्झा खायला दिल्याची माहिती समोर आली होती. हे प्रकरण त्यावेळी पोलिसांच्या चांगलच अंगलट आले होते. त्यानंतर आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे ज्या आरोपींना अटक केली यावेळी येरवडा पोलिसांनी पुरेशी काळजी घेतल्याचे पाहायला मिळाली. या प्रकरणात अटक असलेल्या भाग्येश ओसवाल याचे मित्र काल रात्री त्याला कोल्ड कॉफी आणि बर्गर घेऊन आले असता ‘असे बाहेरचे पदार्थ एखाद्या आरोपीला खायला देता येत नाही’ असं म्हणत पोलिसांनी त्याला थेट हाकलून दिल्याचे पहायला मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-संजय काकडेंच्या पत्नीला विषबाधा? रुग्णालयात केलं दाखल, नेमकं कारण काय?
-लेकाच्या संतापजनक कृत्यावर बापाची प्रतिक्रिया; ‘तो माझा मुलगा, त्याने सिग्नलवर नाही तर माझ्या…’
-बड्या बापाच्या लेकाचा माज; दारुच्या नशेत रस्त्यावर अश्लील चाळे, पाहा व्हिडीओ
-स्वारगेट अत्याचार: ‘माझ्या बदनामीला जबाबदार कोण?’ पीडितेच्या प्रश्नावर पोलीस काय म्हणाले?