पुणे : सध्या समाजामध्ये अनेक मुले बिनलग्नाची आहेत. त्यासाठी अनेक कारणे आहेत ती म्हणजे, मुलींची संख्या कमी, अनेक मुलींना शिक्षण, करिअर करायचे आहे, तर काही मुलींच्या अपेक्षा असतात, पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये फ्लॅट हवा, मुलाला सरकारी नोकरी हवी अशा अपेक्षा त्यामुळे शक्यतो ग्रामीण भागातील शेतकरी मुले लग्नासाठी वनवन करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्यांचीही काही कमी नाही. असेच लग्न करु इच्छिणाऱ्या तरुणांना हेरून त्यांची फसवणूक करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
अहमदनगरच्या श्रीगोंदा पोलिसांनी मुलीचे लग्न लावून देणाऱ्या अशाच एका टोळीला जेरबंद केले आहे. श्रीगोंदा तालुक्यातील मुंगुसगाव येथील एका तरुणाकडून २ लाख १५ हजार रुपये घेऊन त्याचे सिमरन नावाच्या मुलीशी लग्न करण्यात आले. लग्नानंतर लगेचच या मुलीने पळून जायला निघाली अन् मुलीचा व तिच्या कुटुंबियांचा डाव फसला. उगले कुटुंबाच्या सतर्कतेमुळे पळून जाणाऱ्या मुलीसह टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.
शेतकरी कुटुंबातील मुलांना हेरायचे आणि लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक करायचे हेच या टोळीचे काम. श्रीगोंदा तालुक्यातील नितीन उगले नावाच्या शेतकरी मुलाची देखील या टोळीने फसवणूक केली आहे. लग्नानंतर उगलेच्या कुटुंबाला मुलगी आणि त्या टोळीचा संशय आला होता. पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या मुलगी आणि तिच्या कुटुंबाचा डाव उगले कुटुंबाने हाणून पाडला.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने उगले कुटुंबियांनी आशा गौतम पाटील, सिमरन गौतम पाटील, शेख शाहरूख शेख फरीद, दीपक पाडुरंग देशमुख, अर्जुन रामराव पाटील ऊर्फ कर्णन गौतम पाटील ,सचिन बलदेव राठोड ऊर्फ राजूरामराव राठोड , युवराज नामदेव जाधव यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, पोलिसांनी कारवाईसाठी आणि इतर आरोपींच्या शोधासाठी उगले यांच्याकडूनच पैसे घेतल्याचा आरोप अशोक उगले यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘हे’ कागदपत्र अत्यंत महत्वाचे
-दारु पिऊन गाडी चालवल्यास मिळणार ‘ही’ मोठी शिक्षा; पुणे पोलिसांचा मोठा निर्यण
-‘भाजपच्या वरिष्ठांकडून फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रयत्न’; खासदार अमोल कोल्हे असं का म्हणाले?
-आमदार महेश लांडगेंच्या पाठपुराव्याला यश; जाधववाडी-चिखलीत साकारणार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय!
-भाजपच्या अमित गोरखेंना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर, तरीही भाजपात निरुत्साहच? नेमकं कारण काय?