पुणे : पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी आज काँग्रेसने ते राहुल गांधी यांची सभा पार पडणार आहे. सभेसाठी काही तासांचा अवधी असताना काँग्रेसमधील दोन स्थानिक नेत्यांमध्ये झालेल्या वादाची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. त्यामुळे उमेदवारी मिळवण्यापासून सुरू झालेली वादाची मालिका अद्यापही कायम असल्याचं दिसत आहे.
पुणे लोकसभा निवडणुकीसाठी माहाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर हे निवडणूक लढवत आहेत तर महायुतीकडून मुरलीधर मोहोळ हे रिंगणात उतरले आहेत. धंगेकरांची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवसापासून शहर काँग्रेस पक्षांतर्गत वादाला तोंड फुटले आहे. एकतर धंगेकर यांच्या उमेदवारीला काहींचा विरोध होता. त्यामध्यें काँग्रेसचे नेते आबा बागुल हे अग्रस्थानी होते. त्यांनी बंड पुकारत आंदोलनही केले. त्यानंतर फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी समजूत काढल्यानंतर आबा बागुल यांनी त्यांची बंडाची तलवार म्यान केली.
राहुल गांधींची सभा असल्याने त्यांच्या बरोबर व्यासपीठावर स्थानिक नेत्यांपैकी कोण कोण बसणार यावरून शहराचा पदाधिकारी आणि राज्य पातळीवरील पदाधिकाऱ्यामध्ये शाब्दिक चकमक उडाल्याची माहिती आहे. व्यासपीठावर राहुल गांधींबरोबर बसणाऱ्या पदाधिकाऱ्यांनीही पोलिसांचे सुरक्षा पास आवश्यक आहे. ते घेतानाच त्यासाठी कोणाची नावे द्यायची यावरून या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांसमोरच शाब्दिक चकमक झाली. शेवटी अधिकाऱ्यांनीच लवकर काय ते सांगा असे म्हटल्यानंतर वादाची मिटवामिटवी करण्यात आली. मात्र, जे सुरक्षा पास सकाळी मिळणार होते ते अगदी सभेच्या एक तास अगोदर देण्यात आले.
महत्वाच्या बातम्या-
-“२ वेळा बोललात, तिसऱ्यांदा बोलला तर करारा जवाब मिलेगा”; सुप्रिया सुळेंचा इशारा
-पुण्यातील वाहतूकीत ४ मे पासून महत्वाचे बदल; जाणून घ्या कोणते रस्ते बंद, कोणता पर्यायी मार्ग?
-“कामं करायला पण हिंमत लागते धमक लागते, प्रशासनावर पकड पाहिजे”- अजित पवार
-Baramati | “सासऱ्याचे दिवस राहत नाहीत, कधीतरी सुनेचे दिवस येतील”; अजितदादांचा काकांना टोला