पुणे : गणरायाच्या आगमनानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण भक्तीमय झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यासह इतर शहरांमध्ये देखील गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. येत्या काही दिवसांवर येऊन ठेवलेला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या माध्यमातून इच्छुकांनी साखर पेरणी सुरू केलीय. मतदारसंघातील गणेश मंडळांना भेटी देत मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला जातोय, तर दुसरीकडे घरच्या गणपतींचे दर्शन घेण्याच्या निमित्ताने थेट नागरिकांच्या भेटीगाठींवर जोर दिला जात आहे.
पर्वती विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असणारे महापालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जात श्रींचे दर्शन घेतले. यावेळी गणरायाच्या दर्शनासोबतच भिमाले यांच्याकडून विधानसभा निवडणुकीची साखर पेरणी केली जात असल्याचं दिसत आहे. मतदारसंघात वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून सुपर ऍक्टिव्ह असणारे भिमाले यानिमित्ताने भाजपचे राज्यातील शिरस्त नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
लाडकी बहीण योजनेची नोंदणी असो की आरोग्य शिबिर, मध्यंतरी गणेश कला क्रीडा मंच येथे घेण्यात आलेला महिलांचा सन्मान सोहळा देखील मोठा चर्चेचा विषय बनला होता. यावेळी अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीमुळे पर्वतीतील वातावरण ढवळून निघाल. गणेशोत्सवाच्या निमित्ताने देखील मतदारसंघातील मंडळांना भेट देण्यावर श्रीनाथ भिमाले यांच्याकडून जोर देण्यात आला आहे. आता फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जात बाप्पांचे दर्शन घेतल्याने भिमाले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवारांच्या मेळाव्याला आढळराव पाटलांची दांडी; पुन्हा शिंदेंच्या शिवसेनेत जाणार?
-वनराज आंदेकर प्रकरण: गुन्हे शाखेकडून ८ पिस्तुलं १३ काडतुसे जप्त, अन्…
-पुणेकरांनो सावधान! एक कॉल तुमचं बँक अकाऊंट साफ करू शकतो; ८ महिन्यात २८ कोटींची लूट
-पुण्यात तीन जागांवर महायुतीची डोकेदुखी; भाजपसह राष्ट्रवादी अन् शिवसेनेच्या दाव्याने चुरस
-पुणेकरांना आता शहरातील ध्वनीप्रदूषणाची पातळी पाहता येणार; शहरात लागणार डिजीटल बोर्ड