गडचिरोली | पुणे : राज्यात एकीकडे विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. सत्ताधारी विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहे. विकासाच्या गप्पा अनेकांकडून मारल्या जात आहेत. मात्र, राज्यातील काही भागांमध्ये साधी आरोग्य सेवाही उपलब्ध नसल्याने कित्येकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गडचिरोलीमधून एक धक्कादायक व्हिडीओ आता समोर आला आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील पत्तीगावामधील एका दाम्पत्याची दोन्ही मुले तापाने फणाणली होती. गावात साधी प्रमोपचाराची सेवाही मिळत नाही. रुग्णवाहिकेचीही सोय नाही म्हणून या दाम्पत्याने आपल्या लेकरांचा मृतदेह १५ किलोमीटरची पायपीट करत रुग्णालयातून घरी आणला.
बाजीराव रमेश वेलादी (६ वर्षे) आणि दिनेश रमेश वेलादी (साडे ३ वर्षे, दोघे रा. येर्रागड्डा, ता. अहेरी) अशी या भावंडांची नावे आहेत. पत्तीगाव हे त्यांचे आजोळ आहे. आजोळी आलेल्या या चिमुरड्यांना ताप आला होता. अशिक्षित असल्याने आई-वडिलांनी मुलांना दवाखान्यात नेण्या ऐवजी एका पुजाऱ्याकडे नेले. मात्र त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि दोघांचाही मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णालयात या दोघांना रुग्णालयात नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, ग्रामीण भागातील अशिक्षितांचा औषधोपचारापेक्षा अंद्धश्रद्धेवर विश्वास या घटनेला कारणीभूत असला तरीही आरोग्य व्यवस्थाही तितकीच कारणीभूत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच या घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे १ भीषण वास्तव पुन्हा समोर आलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘आता बाप दाखव नाहीतर तर श्राद्ध कर, हा सूर्य…’; पंकजा मुंडेंची शरद पवार गटावर आगपाखड
-गणेशोत्सवात आवाज कमी; गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांना मेधा कुलकर्णींचं आवाहन
-नाना पटोलेंसाठी भावी मुख्यमंत्री म्हणून घोषणा अन् बागुलांना उमेदवारी देण्याची मागणी
-…म्हणून पालिकेने गणेश मूर्ती विक्रेते अन् मंडळांना धाडल्या नोटीसा; वाचा कारण काय?