पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीकडून भाजपच्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये भोसरीमधून विद्यमान आमदार महेश लांडगेंना उमेदवारी मिळाली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार लांडगे यांनी चऱ्होली गावचे ग्रामदैवत श्री. वाघेश्वर महाराज मंदिरात दर्शन घेवून प्रचाराला सुरूवात केली. यावेळी लांडगे यांनी २ माजी महापौरांसोबत शड्डू ठोकला आहे.
‘जन्मदाती आईनंतर जास्त प्रेम देते, आपुलकीने जपते, जगायला शिकवते ती मावशी म्हणूनच भोसरी माझी आई; तर चऱ्होली माझी मावशी आहे. माझ्या राजकीय वाटचालीमध्ये चऱ्होलीकरांनी कायम साथ दिली’, अशी भावना आमदार लांडगे यांनी व्यक्त केली आहे. नितीन काळजे आणि राहुल जाधव हे दोन्ही माजी महापौर लांडगे यांच्यासोबत होते.
“माझ्या राजकीय संघर्षाच्या काळात चऱ्होलीकरांनी दिलेला आधार कदापि विसरु शकत नाही. मतदारसंघातील नागरिकांना अभिमान वाटावा, असे काम करीत राहीन. माझे जीवाभावाचे सहकारी सोबत आहेत. ‘जब साथ हो मेरे दोस्त…तो संघर्षपथपर विजय निश्चित हैं..!’ याची अनुभूती येते आहे. अत्यंत सकारात्मक- मंगलमय वातावरणात निवडणुकीचा प्रचार सुरू आहे”, असे महेश लांडगे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-चिंचवडमधून शंकर जगतापांना उमेदवारी जाहीर; म्हणाले, ‘आमच्यात उमेदवारीवरुन वाद नव्हता’
-नागरिकांना प्रलोभन अन् आमदारांना दिवाळी किट वाटपाची घाई; धंगेकरांवर गुन्हा दाखल
-Assembly Election: काँग्रेस भवनात आघाडीच्या नेत्यांची बैठक; प्रशांत जगताप म्हणाले, ‘निष्ठावंतांना…’
-आजवर साथ दिली आता उमेदवारी द्या, कसब्यात मुस्लिम समाज आग्रही; थेट घेतली प्रभारींची भेट