पुणे : देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीच्या बाजून कौल दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात अवघ्या एका जागेवर विजय मिळाला आहे. त्यातच आता महायुतीमध्ये पुणे शहारात तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी चिंचवड विधानसभा आणि भोसरी विधानसभेवर दावा केल्यानंतर या मतदारसंघात भाजपची मोठी ताकद आहे. तिथे भाजपचे आमदार आहेत, त्यामुळे या ठिकाणी भाजपचेच उमेदवार असतील असे प्रत्युत्तर भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिले आहे. यावरुन आता राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप यांच्यात जुंपल्याचे पहायला मिळत आहे.
चिंचवड विधानसभेची तयारी करत असल्याचे देखील शंकर जगताप यांनी म्हटले आहे. शंकर जगताप यांच्या वहिनी, अश्विनी लक्ष्मण जगताप सध्या चिंचवडच्या विद्यमान आमदार आहेत. त्यातच आता अजित पवार गटाकडूनही असा दावा करण्यात आल्याने आगामी काळात या मतदारसंघात काय परिस्थिती असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
विधानसभा निवडणूक आता ३ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. चिंचवड आणि भोसरी विधानसभेवर अजित गव्हाणे यांनी दावा केला आहे. एवढेच नाही तर या संदर्भात आम्ही वरिष्ठ नेत्यांशी बोलणारा असून शेवटच्या क्षणापर्यंत आमचा दावा या दोन्ही विधानसभेवर असणार असा विश्वास व्यक्त केला आहे. स्वतः अजित गव्हाणे हे भोसरी विधानसभेसाठी इच्छुक असून त्यांनी आमदारकीची तयारी सुरू केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“पोलिसांच्या दुर्लक्षावर पुन्हा शिक्कामोर्तब…” गंगाधाम चौक अपघातानंतर मेधा कुलकर्णी आक्रमक
-ससून रुग्णालयाचा आणखी एक अजब कारभार; उपचार केंद्र की लुटरुंचं केंद्र? नेमका काय प्रकार
-आता पुण्याच्या या भागातही करता येणार बसने प्रवास; वाचा पीएमपीएमएल प्रशासनाचा महत्वाचा निर्णय
-पुण्यात आणखी एक भीषण अपघात; डंपरने महिलेला चिरडले, महिलेचा जागीच मृत्यू
-पावसाळ्याच्या दिवसांत पचनशक्ती मंदावते; काय खावे काय खाऊ नये?