पुणे : लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. या फुटीनंतर राष्ट्रावादीत दोन गट पडले आणि दोन्ही गटाने एकमेकांविरोधात टीकास्त्र सुरु केले. आजवरच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच पवार कुटुंब एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघात बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात प्रचाराची रणधुमाळी दिसून येत आहे. त्यातच सुप्रिया सुळे आणि अजित पवार या दोघांमध्ये तुफान खडाजंगी पहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. केवळ संसदेत भाषण ठोकून, संसदरत्न पुरस्कार मिळवून आणि सेल्फी काढून कामे होत नाहीत, असा खोचक टोला अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना लगावला होता. या टीकेला सुप्रिया सुळेंनी देखील नाव न घेता जहरी टीका केली होती.
सुप्रिया सुळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना, ‘आता मी माझा प्रचार करण्यासाठी माझे पती सदानंद सुळे यांना आणू का? सभागृहात नवऱ्याला येऊ देत नाहीत. संसदेत नवऱ्यांना कॅन्टीनमध्येच पर्स सांभाळत बसावं लागतं, अशी टीका केली होती. यावरुन आता पुण्याच्या माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
“खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्य बालिशपणाचं आहे. सुळे यांनी हे वक्तव्य कोणाला उद्देशून केलं हे संपूर्ण जगाला माहित आहे. अजितदादा हे प्रचाराला एक नवरा म्हणून आलेले नव्हते तर एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तेथे आले होते. बारामती मतदारसंघाचे ते आमदार आहेत. त्या भागाचा विकास त्यांनी अनेक वेळा केलेला आहे. मुख्य म्हणजे ते राज्याची उपमुख्यमंत्री आहेत”, असं राजलक्ष्मी भोसले म्हणाल्या आहेत.
“गेली अनेक वर्षे अजितदादा हे तुमच्या प्रचाराला येत होते. किंबहुना अजितदादांनी जर का तुमच्या निवडणुकीत प्रचार केला नसता तर तुमचे काय झाले असते हे सगळ्या जगाला माहित आहे”, असं राजलक्ष्मी भोसले म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-जानकर शरद पवारांच्या साथीला?; पवारांनी जानकरांसाठी सोडली माढाची जागा
-आढळराव पाटलांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा विरोध; म्हणाले, ‘आयात…’
-‘येत्या काळात ठाकरे-मोदी एकत्र येणार’; शहाजी बापू पाटलांनी वर्तवलं भाकित
-पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम; वाहतूक नियमात बदल करुनही ट्रफिकच
-‘दादांनी आधी पुरंदर विधानसभेचा मला शब्द द्यावा’; विजय शिवतारेंची जाहीर मागणी