पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि पर्वती विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचे आज निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, देन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. विश्वसा गांगुर्डे हे गेले काही दिवस आजारी होते.
गेली ७ दिवस त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. विश्वास गांगुर्डे यांचे पार्थिव सकाळी साडे १० वाजता त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. दुपारी १२ वाजता वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पुणे शहरातील भारतीय जनता पक्षाचे काम तळागाळापर्यंत नेण्याचे काम त्यांनी केले होते. रूपी बँकेचे संचालक होते. पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून ते निवडून आले. तसेच १९९९ मध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघातून विश्वास गांगुर्डे आमदार झाले होते.
महत्वाच्या बातम्या-
-होऊ दे खर्च! लोकसभेला खर्च करण्यात बारणेंची आघाडी, सर्व उमेदवारांना टाकल मागे
-गाड्यांच्या आकर्षक नंबरसाठी जाणून घ्या कशी असणार आरटीओची लिलाव प्रकिया?
-मतदानापूर्वी पोलीस ठाण्यात राडा; रवींद्र धंगेकरांसह ३० ते ३५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल