पुणे : महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार आहेत. आजपासून दोन्ही राज्यांमध्ये आचारसंहिता लागू होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज त्यांच्या पुण्यातील निवसस्थान असलेल्या मोदी बागेत असून अनेक बड्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली आहे. यावेळी खासदार बजरंग सोनवणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांच्यावर शरसंधान साधले आहे.
‘दसरा मेळाव्याला कोयता घासून ठेवायला सांगतात. गेल्या दोन पिढ्या झाल्या त्या फक्त कोयता घासायला लावत आहेत. पण माझ्या बीड जिल्ह्यातील जनतेला कधीतरी ऊस लावायला सांगा. कोयताच घासून कापायला लावता, अन् त्याच्यावरच भांडवल करता, राजकारण करता. एकदा बेणं चांगलं आणा आणि ऊस चांगला येण्यासाठी जिल्ह्याला पाणी आणा’, असे बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडेंवर शरसंधाण साधले आहे.
‘हे कुठेतरी थांबलं पाहिजे. वेळोवेळी कोयताच घायसलाय लावणं चांगलं नाही. जिल्ह्यात पाणी आणलं असतं तर ऊस लावला असता, गेले १० वर्ष केंद्रात, राज्यात तुमची सत्ता आहे. सत्ता असताना तुम्ही काय विकास केलाय? १० वर्षांत आमच्या जिल्ह्याला ३ टीएमसी पाणी का आणलं नाही? असा सवालही यावेळी बजरंग सोनवणे यांनी विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-महायुतीत वाद! रिपाइंला हव्यात १२ जागा; उमेदवारी न मिळाल्यास प्रचार न करण्याचा इशारा
-पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; आणखी २ मेट्रो सुरु होणार, कोणत्या मार्गाने धावणार?
-पुणे शहर मार्केटयार्ड ब्लॉक काँग्रेस अध्यक्षपदी विश्वास दिघे
-‘मतदारसंघात चांगलं काम केलं म्हणून चालत नाही, ते सगळ्यांना वाटलं पाहिजे’- आमदार माधुरी मिसाळ