पुणे : उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर आले होते. अजित पवार हे पुणे दौऱ्यावर आले असताना अनेक विकास कामांना गती देणार असल्याचे संकेत अजित पवारांनी दिले आहेत. यावेळी अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना विकास कामांबाबत भाष्य केले आहे.
‘महायुतीच्या सरकारमध्ये पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर हा माझा पहिलाच पुणे जिल्ह्याचा दौरा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांसोबत आज बैठक घेतली. मागील सरकारच्या काळात देखील पुणे जिल्ह्यातील अनेक कामांना वेग देण्याचा मी प्रयत्न केला. मात्र दरम्यानच्या काळामध्ये आचारसंहिता लागू झाल्याने त्या कामांना ब्रेक लागला होता. आता पुन्हा एकदा मेट्रो, रिंग रोड सारख्या प्रकल्पांना वेग देण्याचे काम करण्यात येत आहे’, असे अजित पवार म्हणाले आहे.
‘पुणे शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून पुढील पंधरा दिवसांमध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील पोलिस तसेच महापालिकांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन याबाबतचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे’, असेही अजित पवार यांनी सांगितले आहे.
‘आज मी सारथीला देखील भेट देणार असून सारथी संदर्भातील प्रश्न जाणून घेणार आहे. त्याचप्रमाणे तुळापूर येथे जाऊन विजयस्तंभ येथे देखील भेट देऊन एक जानेवारीच्या कार्यक्रमाची तयारीचा आढावा घेणार आहे. तसेच त्या ठिकाणी असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाला गती देण्याचे काम करायचे आहे. त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आज मी भेट देणार आहे’, सुनील शेळके म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-वाघोलीत भरधाव डंपरने घेतला तिघांचा बळी; मद्यधुंद चालकाने फूटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडलं
-पुण्याच्या पालकमंत्रिपदाबाबत मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘यॉर्कर टाका, गुगली टाका, मी पण बॅट्समन’
-Pune: अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजकांना नाव बदलासाठी धमकीचे फोन
-महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार? संजय राऊत म्हणाले, ‘मुंबईत लढावंच लागेल पण…’
-पुणेकरांनो सावधान! सिग्नल मोडणं पडतंय महागात; ११ महिन्यात ४२ हजार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई