पुणे : राज्यात पावसाचा जोर वाढत असताना दिसत आहे. पुण्यात धरणक्षेत्र परिसरामध्ये तुफान पाऊस सुरु आहे. धरणातून नदीपत्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत असून नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या वेळी झाली तशी परिस्थिती यावेळी होऊ नये, यासाठी प्रशासन अलर्ट झाले आहे.
शहरातील सिंहगड रोड परिसरातील एकतानगर भागात सोसायटींमध्ये पाणी साचले आहे. सोसायट्यांमधील नागरिकांना बाहेर काढले जात आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांच्या जलसंपदा विभागाला पाण्याचा विसर्ग वाढण्याच्या सूचना दिल्या आहेत. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात अतिमुसळधार पावसामुळे धरण भरु लागले आहे. त्यामुळे धरणातून विसर्ग वाढवण्याच्या सूचना अजित पवारांनी दिल्या आहे. धरणात ६५ टक्केपर्यंत पाणी सोडावे असे अजित पवारांनी सांगितले आहे.
पाणी सोडतापूर्वी नागरिकांना सूचित करावे. खडकवासला धरण हे ६५ टक्केपर्यंत खाली केलं तर रात्री पाऊस पडला तर धरणात पाणी राहील, असे अजित पवारांनी सूचना दिल्या आहेत. अशा स्थितीमध्ये धोकादायक क्षेत्रातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे. नागरिकांना निवारास्थाने, कपडे, जेवणाची सर्व व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Pune: काँग्रेसमध्ये शहराध्यक्ष बदलावरुन वाद; अरविंद शिंदे म्हणाले ‘मी त्यांच्याशी…’
-पुणेकरांनो सावधान! खडकवासल्यातून विसर्ग वाढवला; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
-अन् पुण्यातल्या खड्यांवरून मोहोळ झाले आक्रमक, म्हणाले “कामात हयगय करणारे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना…”
-भाजपचे कार्यकर्ते करणार वाहतूक पोलिसांना मदत; शहराध्यक्ष धीरज घाटेंची माहिती