पुणे: पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वीच कुख्यात गुंड शरद मोहोळची कोथरूडमध्ये भर दिवसा हत्या करण्यात आली होती. त्यानंतर कोयता गॅंगने शहरामध्ये दहशत माजवली आहे. यामध्ये आता पुन्हा एकदा शहरात गॅंगवॉरचा भडका उडताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. यामध्ये आंदेकर गंभीर जखमी झाले असून त्यांना केएम रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुणे शहरात खळबळ उडाली आहे.
वनराज आंदेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक असून आज नाना पेठेतील त्यांच्या कार्यालयाजवळ आंदेकरवर गोळीबार करण्यात आला. मारेकऱ्यांनी आंदेकर यांच्यावर गोळीबार केला, यामध्ये पाच गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती असून प्रकृती गंभीर असल्याने केईएम रुग्णालयामध्ये तात्काळ दाखल करण्यात आलं आहे.
पुण्यातील नाना पेठेमध्ये आंदेकर टोळी गेली अनेक दशकांपासून सक्रिय आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरातील वातावरण तणावग्रस्त झाले असून पोलिसांनी देखील मोठा फौजफाटा तैनात केला आहे. हा हल्ला नेमका कोणी केला याचा शोध घेतला जात आहे.
सविस्तर वृत्त थोड्यावेळात..