मुंबई : नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला. आता प्रतिक्षा होती ती फक्त दहावीच्या निकालाची. आता ती प्रतिक्षाही २ दिवसांत संपणार आहे. कारण महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी जाहीर करणार याबाबत मोठी घोषणा केली आहे.
बोर्डाने बारावीचा निकाल २१ मे रोजी जाहीर केल्यानंतर राज्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी आणि पालक दहावीच्या निकालाची वाट पाहत होते. आता अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आता येत्या दोन दिवसात म्हणजेच २७ मे रोजी दुपारी १ वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाइन निकाल दुपारी एक वाजल्यापासून पुढील वेबसाईटवर पाहू शकतात.
https://mahresult.nic.in,
http://sscresult.mkcl.org,
https://sscresult.mahahsscboard.in,
https://results.digilocker.gov.in,
https://results.targetpublications.org या संकेतस्थळांद्वारे निकाल पाहता येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे हिट अँड रन प्रकरणावर बच्चू कडू आक्रमक; म्हणाले, ‘जास्त पैसा झाला की रस्त्यावर मस्ती..’
-सेना-भाजपमध्ये ठिणगी; ‘अमित शाहांनी आम्हाला राज्यपाल बनवण्याचे आश्वासन दिलंय, त्यामुळे दरेकरांनी….’
-अक्रोड खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? अक्रोडाच्या सेवनाचे उन्हाळ्यात होतो अधिक फायदा
-Pune Hit & Run: नातवाला वाचवण्यासाठी ड्रायव्हरला घरात डांबलं, आता पोलिसांनी आजोबालाच….