पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना उद्देशून ‘मुळ पवार विरूद्ध बाहेरचे पवार’ असे वक्तव्य केले होते. शरद पवारांनी केलेल्या या वक्तव्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसह महायुतीच्या नेत्यांनी देखील शरद पवारांवर टीका केली होती. तर विरोधकांकडून त्या टीकेला उत्तर दिलं गेलं आहे. गेल्या २ दिवसांपासून राज्याच्या राजकारणात या मुद्द्यावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये कलगितुरा रंगल्याचं पहायला मिळालं आहे. यावर आता शरद पवारांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे.
“मी तसं बोललेलो नव्हतो. मी जे बोललो होतो. ते पत्रकाराने विचारलं, अजित पवारांनी काही भाषण केलं होतं. त्यांच्या भाषणात सांगितलं की जनतेनं मला निवडून दिलं. त्यांना स्वत: निवडून दिलं. ताईला निवडून दिलं. आता सुनेला निवडून द्या. त्यापुढए त्यांनी आणखी काही वाक्य वापरलं होतं.त्याच्या संबंधित मी फक्त स्पष्टीकरण केलं. यापेक्षा वेगळा काही अर्थ काढण्याची गरज नाही”, असे शरद पवारांनी म्हणाले आहेत.
“देशातील महिला आरक्षणाचा निर्णय घेणारा राज्यातला पहिला मुख्यमंत्री होतो. शासकीय सेवेत आरक्षणाचा निर्णय माझा होता. केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्री असताना लष्करात मुलींना समाविष्ट करून घेण्याचा निर्णय हा माझा होता. असे अनेक विषय आहेत. ज्या निर्णयांमध्ये महिलांना सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल याची काळजी घेण्याचा निर्णय घेतला. आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्याला सार्थ करण्यासाठी त्याचा पाठपुरावा केला”, असंही शरद पवार साताऱ्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-दरवर्षीच्या तुलनेत यंदा सरासरीपेक्षा जास्तच पाऊस; मोसमी पावसाळ्याचा हवामान खात्याने वर्तवला अंदाज
-Maval Lok Sabha | “माझ्या बोलण्याचा गैरअर्थ काढू नका, समोर कोण उमेदवार..”- श्रीरंग बारणे
-डोक्यावर रखरखते ऊन तरीही सुनेत्रा पवारांचा प्रचार सुरू! धायरीत महिलांनी केलं जंगी स्वागत