Aditi Rao Hydari : बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी विवाह बंधानामध्ये अडकली आहे. अदितीने आपल्या प्रियकर सिद्धार्थसोबत लग्नगाठ बांधली आहे. तेलंगणामधील एका मंदिरात या दोघांनी विवाह केला आहे. अदिती राव हैदरीनेही बॉयफ्रेंड सिद्धार्थशी गुपचूप लग्न केल्याची माहिती समोर येत आहे. तेलंगणामधील एका मंदिरात या दोघांनी लग्नगाठ बांधली आहे.
अदिती राव हैदरीने बॉयफ्रेंड सिद्धार्थशी तेलंगणामधील एका मंदिरात गुपचूप लग्न केल्याची महिती समोर आली आहे. गेल्या काही सिद्धार्थ आणि अदिती हे एकमेकांना डेट करत होते. विविध कार्यक्रमांमध्येही सिद्धार्थ-अदितीला एकत्र दिसून आले होते. अदिती आणि सिद्धार्थ या विवाह सोहळ्यात कुटुंबीय आणि जवळचा मित्र परिवार उपस्थित होता.
अदिती आणि सिद्धार्थ यांचा हा दुसरा विवाह आहे. सिद्धार्थ आणि अदिती हे सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत होते. मात्र दोघांनी कधीच नात्याविषयी प्रतिक्रिया दिली नाही. बुधवारी या दोघांनी तेलंगणामधील एका मंदिरात लग्न केल्याची माहिती समोर येत आहे.
मंगळवार २७ मार्च रोजी आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थने श्रीरंगापुरममधील श्री रंगनायकस्वामी मंदिरात सप्तपदी घेतल्या. लग्नाचे फोटो अद्याप समोर आलेले नाहीत. मात्र, हे दोघेजण आज सायंकाळपर्यंत आपल्या विवाहाची अधिकृतपणे घोषणा करू शकतात. नवविवाहित जोडप्याच्या एका झलकची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, चाहत्यांकडून सोशल मीडियावर त्याचे अभिनंदन केले जात आहे.
View this post on Instagram
अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांचे हे दुसरे लग्न आहे. अदितीचा पहिला विवाह हा अभिनेता सत्यदिप मिश्रासोबत झाला होता. अदितीचा पहिला विवाह वयाच्या २४ व्या वर्षी झाला होता. मात्र, अदितीने सिनेसृष्टीत नशीब आजमावण्यास सुरुवात केल्याने लग्नाची लपवण्यात आली होती. काही वर्षानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
अभिनेता सिद्धार्थ याने दिल्लीतील मेघना नारायण हिच्यासोबत २००३ मध्ये विवाह केला होता. मात्र, लग्नाच्या चार वर्षातच दोघांमध्ये वाद होई लागल्याने अखेर त्यांनी २००७ मध्ये घटस्फोट घेतला. अभिनेता सिद्धार्थ आणि अभिनेत्री श्रुती हसन यांच्यातही प्रेमप्रकरण सुरू असल्याची चर्चा होती.
महत्वाच्या बातम्या-
-वसंत मोरे मराठा समाजाचे उमेदवार म्हणून राजकीय वर्तुळात चर्चा; मोरे बैठकीतून तडकाफडकी निघाले
-Pune Lok Sabha | मोहोळांची ताकद वाढली! मुरलीधर मोहोळांच्या पाठिशी आता संजय काकडेंचेही बळ
-बारामतीच्या राजकारणात मोठी घडामोड; सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार पुन्हा येणार एकत्र!