पुणे : लोकसभा, विधानसभा निवडणूक पार पडल्या. राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन काही दिवस उलटले आणि राज्य मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार रविवारी (१५ डिसेंबर) झाला. नागपूर येथे विधानसभेच्या विधीमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री म्हणून भाजपच्या २१, शिवसेनेच्या १२ आणि राष्ट्रवादीच्या १० आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शेतकऱ्याचा मुलगा राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूरचे तिसऱ्यांदा आमदार झालेले दत्तात्रय भरणे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
दत्तात्रय भरणे यांचा जन्म इंदापूर तालुक्यातील अंथर्णेमध्ये १९६८ साली झाला आहे. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी राजकीय जीवनाला सुरवात केली. १९९१ ते ९९ पर्यंत काँग्रेस सदस्य आणि १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य राहिले आहेत. त्यानंतर २०१४, २०१९ आणि २०२४ या कालावधीत दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेवर प्रतिनिधीत्व केले आहे. उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात भरणे यांनी राज्यमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला. १९९६ मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे चेअरमन म्हणून काम पाहिले.
View this post on Instagram
१९९२ साली भवानीनगरमधील साखर कारखान्याच्या संचालक पदी निवडून होते. त्यानंतर २०१३ मध्ये पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि २०१४ साली पहिल्यांदा इंदापूरचे आमदार म्हणून निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू आमदार म्हणून दत्तात्रय भरणे यांची राज्याच्या राजकारणात मोठी ओळख आहे. शेतकरी कुटुंबात जन्म झाला, कोणताही राजकीय वारसा नसलेले आणि अत्यंत साधे व्यक्तीमत्व असणाऱ्या दत्तात्रय भरणे यांनी रविवारी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-नागपूरात शपथविधी अन् बारामतीत फडणवीसांचा बॅनर जाळला; नेमकं काय घडलं?
-मैत्रीसाठी केला मोठा गुन्हा; मित्राला व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जाऊ नये म्हणून केला गोळीबार, अन्….
-स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पालिकेचं उचललं महत्वाचं पाऊल
-कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्वाचं पाऊल; जिल्ह्यात २७ तारखेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
-‘जे नेते आधी काका मला वाचवा, म्हणत होते तेच आता…’; सुनील शेळकेंचा शरद पवारांच्या नेत्यांना टोला