पुणे : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या कारनाम्यानंतर आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात एका बनावट आयएएस अधिकारी महिलेने धुमाकूळ घातला आहे. या महिलेने खासगी सावकारी सुरू केली असून व्याजाच्या नावाखाली अनेक महिलांची लुबाडणूक केल्याचेही समोर आले आहे. या तरुणीच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेलाही तिने धमकी दिल्याचे उघड झाले आहे.
रेणुका ईश्वर करनुरे असे या तरुणीचे नाव असून ही आपली ओळख आयएएस अधिकारी असल्याचे सांगत आहे. पुण्यातील लोणी काळभोर परिसरात या तरुणीला अनेक महिलांना व्याजाने पैसे देत त्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील वडकी परिसरात राहणाऱ्या रेणुका करनुरे या महिलेने परिसरातील अनेक महिलांना व्याजाने पैसे देऊन त्यांच्याकडून दरमहा १० टक्क्याने पैसे उकळले आहेत. या प्रकरणी रेणुका करनुरेच्या विरोधात एका ३१ वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अवैध सावकारकीचा गुन्हा दाखल केला आहे.
‘मी आयएएस अधिकारी आहे, माझ्या नादाला लागू नको. तुला कामाला लावेन, माझे पैसे तू ताबडतोब दे’ असे म्हणत धमकवण्यास सुरुवात केली. या सगळ्या त्रासानंतर पीडित महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आता बनावट आयएएस अधिकारी रेणुका ईश्वर करनुरे हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर रेणुकाची अनेक प्रकरणे आता समोर येत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Manu Bhaker: ‘मनू’ने जिंकलं भारतीयांचं मन; कांस्यपदक मिळवून देत बनली भारताची पहिली महिला नेमबाज
-पावसामुळे रद्द झालेल्या पोलीस शिपाई पदाच्या ४४८ जागांसाठी भरती; नवे वेळापत्रक जाहीर, वाचा…
-Pune Rain: काहीशा विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस; पुढील दोन दिवस शहराला ऑरेंज अलर्ट
-ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना मोठा धक्का? शरद पवार अन् अजित पवार गटाचे आमदार एकाच मंचावर