पुणे : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे. त्याच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. खासदार रवींद्र वायकर यांच्या मेव्हण्याच्या मतमोजणी केंद्रात मोबाईल फोनवापर प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. ईव्हीएमशी जोडलेला फोनच वायकरांच्या मेहुण्याला वापरायला दिल्याची माहिती मिळत आहे.
ज्या मोबाईल फोनवरुन ईव्हीएम अनलॉक केलं तोच मोबाईल देण्यात आल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, याच मोबाईलवर आलेल्या ओटीपीने ईव्हीएम अनलॉक केले गेले. पोल पोर्टल ऑपरेटर दिनेश गुरव यांनी वायकरांचे मेहुणे मंगेश पंडीलकर यांना मतमोजणी केंद्रात आपला फोन वापरायला दिल्याचा आरोप केला जात आहे.
मतमोजणी केंद्रात फोनचा वापर करण्यास मनाई होती. पोलिसांनी फोन जप्त करून FSL ला पाठवला आहे. आता फोनवरील बोटांचे ठसे घेतले जाणार आहेत. तसेच पंडीलकर यांनी कोणाशी बोलणं केलं, याचा देखील पोलीस तपास करणार आहे. दोघांनाही ४१(अ) ची नोटीस बजावत हजर राहण्याचे समन्स पाठवण्यात आले आहेत.
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या निकालाविरोधात अमोल किर्तीकरांनी निवडणूक आयोगात धाव घेतली होती. मुंबई पोलिसांनी नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकांसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. वायकर यांच्या नातेवाईकांनी ईव्हीएम अनलॉक करणारा फोन वापरल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी एफआर नोंदवला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘भाजपचा अजिंक्यपणा फोल, हे सरकार किती दिवस चालेल? हा मोठा प्रश्न’; उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा
-केंद्रीय राज्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर मोहोळ पहिल्यांदाच पुण्यात; विमानतळावर जंगी स्वागत
-आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणाचा तपास आता पुणे पोलिसांनी कोणाकडे सोपवला?