पुणे : लोकसभा निवडणुकीचे शिरुरचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मतदारसंघात जोमाने प्रचार सुरु आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे मंचर येथे गेले असता प्रत्येक ग्रामस्थाचं मत म्हणजे मंचरच्या विकासाला मत असल्याचा सुर मंचरच्या गावबैठकीत व्यक्त करण्यात आला.
आंबेगाव तालुक्याचे सुपुत्र असलेल्या आढळराव यांना संपुर्ण पाठिंबा देण्यासाठी मंचर येथील भैरवनाथ गल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत मंचर शहरातील विविध राजकीय पक्ष, शैक्षणिक संस्था, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी बांधव, शेतकरी इत्यादींनी आढळराव पाटील यांना पाठिंबा देऊन मताधिक्क्याने विजयी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या बैठकीला सर्वच जातीधर्माच्या ग्रामस्थांनी हजेरी लावली. तर उद्योजक आणि शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शेठ शहा, भीमाशंकरचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे आदी उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब बेंडे म्हणाले की, जो विकास करतो, त्याच्यामागे पाठीमागे ठामपणे उभे राहणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी आंबेगावचे सुपुत्र आढळराव पाटील यांच्यासारख्या सक्षम नेत्याला निवडून देण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे.
आवाज मंचरकरांचा नव्या विकासपर्वासाठी,
खमका पाठिंबा, खमक्या महायुतीसाठी !@ajitpawarSpeaks@mieknathshinde@Dev_Fadnavis#NCPSpeaks_Official@Shivsena@BJPMaharashtra@RamdasAthawale@RajThackeray@ChetanVTupe#शिरूर #अढळनेतृत्व #shivajiraoadhalraopatil #adhalraopatil… pic.twitter.com/lSNw2jwgjH— Shivajirao Adhalrao (@ShivajiAdhalrao) April 23, 2024
“स्वकर्तृत्वान असलेले आढळराव पाटील यांनी आंबेगाव तालुक्याच्या विकासाचा चेहरामोहरा बदलला आहे. रामदास बाणखेले म्हणाले की, आढळराव पाटील यांनी स्वत: खासदार नसतानाही मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून विकास निधी आणल्यामुळे मंचरकर खूश राहणार” असल्याचे व्ही. एस. महामुनी, सीताराम लोंडे यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘माझ्या भावाच्या पराभवाचा बदला मी घेणारच’; रोहित पवारांनी उचलला बारणेंच्या पराभवाचा विडा
-पुण्यातील मुकुंदनगर येथील केशव व्यंकटेश चाफेकर क्रीडागृहात आग