पुणे : पुणे महापालिकेने मुळा-मुठा नदीकाठी संवर्धन, पुनरुज्जीवन आणि सुशोभिकरण योजनेंतर्गत नव्याने वृक्ष लागवड करण्यासाठी ५ कोटी रुपये खर्च करण्याचा घाट घातला आहे. मात्र वृक्ष लागवड करण्यासाठी जागाच उपलब्ध नाही तर या ५ कोटी रुपयांची उधळपट्टी होणार असल्याचं स्पष्ट चित्र दिसत आहे.
या ५ कोटी रुपयांची उधळपट्टी होणार असून त्यासंदर्भातील निविदा प्रक्रिया महापालिका प्रशानसाकडून राबविण्यास सुरुवात झाली आहे. मात्र पुरेशी जागा नसताना वृक्ष लागवड कुठे करणार, असा सवाल पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित करण्यात आला आहे.
जागे नसल्या कारणाने वृक्ष लागवडीचा प्रयत्न हा कागदावरच राहण्याची शक्यता असून ५ कोटींची केवळ उधळपट्टी होण्याची शक्यता आहे. मुळा-मुठा नदीकाठ संवर्धन, पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण योजनेंतर्गत नव्याने पर्यावरणीय मंजुरी मिळविण्यासाठी महापालिकेने राज्य पर्यावरण मूल्यांकन प्रभाव परिणाम प्राधिकरणाला अहवाल देखील सादर केला आहे.
नदीच्या हरित पट्ट्यातील २२ हजार १५० झाडे बाधित होणार असल्याचे नमूद केले आहे. बाधित वृक्षांपैकी ११ हजार झाडे तोडली जाणार असून, ११ हजार १५० वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. तर एकूण ३० हजार वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड होणार का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कोणाच्या घशात जाण्याअगोदर खडकवासल्याच्या ऑक्सिजन पार्कचं काम सुरु- चंद्रकांत पाटील
-योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याचा प्रशांत महाराजांकडून निषेध; म्हणाले…
-पुण्यात भाजपचे इव्हेंट वॉर; इच्छुक उमेदवार सुनिल देवधर मात्र एकाकी
-टिईटी घोटाळ्यातील आरोपीचे एक कोटिचे दागिने न्यायालयाकडून परत!!
-सुनेत्रा पवार यांच्या बॅनरवर शाईफेक; सुप्रिया सुळे म्हणाल्या…