पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. या गुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी चांगलीच कंबर कसली आहे. शहरातील सर्व गुंडांची परेड काढून त्यांना चांगलाच दम भरला होता. आता पुणे पोलिसांनी सगळ्या गुंडांची, गुन्हेगारांती प्रत्येकाची डिजीटल कुंडली काढण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आता सर्व गुंडांवर पोलिसांची करडी नजर ठेवली आहे.
गुन्हेगारीच्या घटना नियंत्रणात आणून गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पुणे पोलीस दलात ‘क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट’ची स्थापना केली जाणार आहे. पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखा आणि सायबर शाखेतील कर्मचाऱ्यांना एकत्रित करून या नव्या युनिटीची स्थापना केली जाणार आहे. या अंतर्गत पुणे पोलिसांकडून प्रत्येक गुन्हेगारांची डिजिटल कुंडली काढण्यात येणार आहे. पुण्यातील गुन्हेगारीचा वेग वाढता आहे. पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पहिल्याच काही दिवसांच ही गुन्हेगारी रोखण्यासाठी पुण्यातील कुख्यात गुंड टोळ्या, त्या टोळ्यांचे म्होरके आणि इतर गुन्हेगारांना बोलवून त्यांची परेड काढली.
कोणत्याही प्रकारचा गुन्हा करायचा विचार केला तर याद राखा, अशा शब्दांत त्यांना दम दिला. त्यानंतर सोशल मीडियावरुन गुन्हेगारी पसरवायची नाही, रिल्स पोस्ट करायचे नाही, अशा कडक शब्दांत सूचना दिल्या. त्यानंतरही शहरात अनेक गुन्हे घडलेच. त्यावर उपाय म्हणून आता पिस्तूल धारकांवर पुणे पोलिसांनी नजर असणार आहे. या सगळ्या गुन्हेगारांची यादी तयार केली आहे. आता त्यांना बोलवून दम दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुणे पोलीस आता बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांची झाडाझडती घेणार आहे. या झाडाझडतीची तयारी पुणे पोलिसांनी सुरु केली आहे. विविध भागातील पोलीस ठाण्यातून माहिती देखील मागवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-स्टंटबाजी करणं दोघांना पडलं महागात; पोलिसांनी ताब्यात घेत केली कायदेशीर कारवाई
-‘मीच एकटा आहे, हे भासवणं म्हणजे लोकांना भावनिक होणं’; काकांनी सांगितला ‘भावनिक’ शब्दाचा अर्थ
-स्वाती मोहोळला धमकावणारा ससूनमधून पळाला होता; मार्शल लीलाकरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या