पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ पुणे मतदारसंघ पिंजून काढत आहेत. शहरातील बिबवेवाडी परिसरात येथे आज मुरलीधर मोहोळ प्रचारासाठी गेले असता तेथिल स्थानिकांच्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. पर्वती विधानसभा मतदारसंघातील आंबेडकर नगर, आदिनाथ सोसायटी, प्रेमनगर, गंगाधाम, मार्केट यार्ड बस डेपो, महेश सोसायटी, चिंतामणीनगर, अप्पर इंदिरानगर आदी परिसरात मोहोळ यांच्या प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी नागरिकांशी संवाद साधला.
“बिबवेवाडी येथील ईएसआयसी अर्थात कामगार विमा रुग्णालयात १०० बेडचे सुसज्ज रुग्णालय कार्यान्वित झाले असून १६ एकर जागेतील सात मजली इमारतीत ५०० खाटांचे सर्व आधुनिक सोयींनी सुसज्ज विस्तारीत रुग्णालयाचे काम नजिकच्या काळात पूर्ण होईल. त्यामुळे पर्वती, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होतील”, असे मत मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
“ससूनच्या धर्तीवर रुग्णालय उभारू अशी घोषणा काँग्रेसकडून अनेक वर्षे केली गेली. पण ती कधीही प्रत्यक्षात आली नाही. आमदार माधुरी मिसाळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने केंद्र शासन हे रुग्णालय उभारत आहे. नव्या प्रशस्त रुग्णालयात अतिदक्षता विभाग, बाह्यरूग्ण कक्ष, सुपर स्पेशालिटी सुविधांसाठी स्वतंत्र कक्ष, साधारण व अतिदक्षता विभागाचे कक्ष असतील. रेडिओलॉजी, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळांचा समावेश असेल. पुढील २ वर्षांत बांधकाम पूर्ण होईल”, असेही आश्वासन मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहे.
“पुणे महापालिकेचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय माझ्या महापौर पदाच्या कारकिर्दीत सुरू करता आले याचा विशेष आनंद वाटतो. या महाविद्यालयामुळे वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण आणि रुग्णांना किफायतशीर दरात आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत. कोरोना काळात शहराच्या आरोग्य यंत्रणांचे आधुनिकीकरण आणि विस्तार करण्यात आला”, असेही मुरलीधर मोहोळ यावेळी बोलताना म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-१२८ एकरांचे मैदान अन् २ लाख नागरिक; मोदींच्या सभेसाठी भाजपची जय्यत तयारी
-Ice Facial | चेहऱ्यावर बर्फ लावल्याने काय फायदे होतात तुम्हाला माहिती आहे का? एकदा हे वाचाच..
-“…त्यावेळी मी कपडे बदलत होते अन्…”; ‘या’ मालिकेतील मोठ्या अभिनेत्रीने सांगितला भयावह प्रसंग…
-शिरूरच्या गड कोण सर करणार? अमोल कोल्हे की आढळराव पाटलांची ताकद जास्त; पहा काय आहे गणित?