पुणे : शैक्षणिक वर्ष जून महिन्यात सुरु होते. जून महिना सुरु झाला की विद्यार्थी शाळेची तयारी करत असतात. आपल्या आवडीच्या शाळा महाविद्यालयामध्ये प्रवेश घेत असतात. मात्र, शाळा, महाविद्यालयाच्या भरमसाठ प्रवेशफीमुळे अनेक विद्यार्थ्यींनींना इच्छा नसताना दुय्यम दर्जाचे शिक्षण घ्यावे लागते. परभणीमध्ये गेल्यावर्षी एका मुलीने महाविद्यालयाची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने आत्महत्या केली होती.
परभणीच्या घटनेची दखल घेत राज्य सरकारकडून मोफत शिक्षणाची मोठी घोषणा केली होती. शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसावेळी म्हणजे ९ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘१ जूनपासून राज्यात मुलींना मोफत शिक्षण दिले जाईल’, अशी घोषणा केली होती. मात्र, जून महिना अर्धा उलटला तरीही राज्य सरकारचा अद्यापही जीआर निघाला नाही, किंवा अंमलबजावणी झाली नाही. प्रवेशामुळे मुलींना फी भरावी लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
ज्या मुलींच्या पालकांचे ८ लाखांपेक्षा कमी आहे, त्या मुलींना वैद्यकीय, अभियांत्रिकी, लॉसह इतर ६६२ कोर्सेस असून यासाठी कुठलीही फी लागणार नाही, शिक्षण मोफत करणार असल्याची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली होती. पण ही घोषणा हवेतच जिरली आहे. त्यामुळे आता या विषयावरुन राज्यभर चर्चा सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘भाजपचा अजिंक्यपणा फोल, हे सरकार किती दिवस चालेल? हा मोठा प्रश्न’; उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा
-केंद्रीय राज्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर मोहोळ पहिल्यांदाच पुण्यात; विमानतळावर जंगी स्वागत
-आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणाचा तपास आता पुणे पोलिसांनी कोणाकडे सोपवला?
-गजा मारणेसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निलेश लंके म्हणतात, ‘मी त्याच्या घरी…’