Nawazuddin Siddiqui : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. सेलिब्रेटी म्हटलं की झगमगती लाईफ, पार्ट्या हे आलंच. आता ते सामान्य झालं आहे. सेलिब्रेटी आणि स्टार किड्स देखील नेहमी पार्टांचे फोटोज सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. पण नवाजुद्दीन सिद्दिकीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याला आडणाऱ्या दारुचे नाव सांगितले आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकी याला कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी हा विदेशी नाही तर, देशी दारुच्या प्रेमात असल्याचं त्याने स्वत: एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. तुम्ही या देशी दारुच्या एका बाटलीची किंमत ऐकली तर थक्क व्हाल..
“मला होळी हा सण प्रचंड आवडतो. कारण तेव्हा दारु पिण्याची संधी मिळते.’ पुढे अभिनेत्याला त्याच्या आवडत्या दारुबद्दल विचारण्यात आलं. यावर अभिनेता म्हणाला, ‘मला ओल्ड मॉन्क आवडते. ओल्ड मॉन्क देखील ब्रँड आहे”, असे नवाजुद्दीन मुलाखतीमध्ये म्हणाला आहे.
View this post on Instagram
‘ओल्ड मॉन्क’च्या एका दारुच्या बाटलीची किंमत ३५० ते १ हजार रुपयांपर्यंत आहे. ओल्ड मॉन्कची किंमत बाटलीच्या आकारानुसार आहे. सांगायचे झाले तर, नवाजुद्दीन सिद्दीकी याचा आज वाढदिवस आहे. ज्यामुळे अभिनेत्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सुप्रिया सुळेंच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; ‘गुलाल आपलाच’ म्हणत ठिकठिकाणी बॅनर
-Baramati News : बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार भिडणार? काय आहे राजकीय परिस्थिती
-तुम्हालाही उभं राहून पाणी पिण्याची सवय आहे का? मग आजच ही सवय बदला, आरोग्यासाठी ठरते हानिकारक
-पुण्यासह ‘या’ राज्यांमध्ये ८ दिवस पावसाचा मुक्काम; कधीपासून होणार सुरवात, वाचा सविस्तर अपडेट्स
-बड्या बापाच्या बिघडेल मुलाचा ‘कार‘नामा; भरधाव कारने दोघांना चिरडले! तरुण, तरुणीचा जागीच मृत्यू