Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही आपल्या नृत्य, फिटनेस, किंवा तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतच्या घटनांमुळे नेहमीच चर्चेत असते. आता मलायका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मलायकाने तिच्या वांद्र्यातील अपार्टमेंटला भाड्याने दिले असल्याची माहिती आता समोर आली आहे. मलायकाने तिचे घरं डिझायन कशिश हंस हिला भाड्याने दिले आहे. ३ वर्षांसाठी तिने हे घर दिले असून त्याचे महिन्याचे भाडे हे जवळपास १ लाख ५७ हजार रुपये इतके आहे.
मलायकाने तिचे घरं भाड्याने दिले आहे त्याचे भाडे महिन्यासा १ लाख ५७ हजार रुपये इतके असले तरीही करारानुसार, या घराचे दर दरवर्षी महिन्याचे भाडे हे ५ टक्क्यांनी वाढेल, असेही सांगितले आहे. त्यामुळे या ३ वर्षात कशिशला पहिल्या वर्षी दर महिन्याला १ लाख ५ हजार, दुसऱ्या महिन्याला १ लाख ५५ आणि तिसऱ्या वर्षाला १ लाख ७६ हजार रुपये महिन्याला भाडे द्यायचे आहेत.
मलायकाने कशिश हंस हिला भाड्याने घर दिले आहे. या घराचे डिपॉझिट देखील असेच थक्क करणारे आहे. २९ एप्रिल रोजी या घराचा व्यवहार करण्यात आला आहे. त्यानुसार, तिसऱ्या वर्षाच्या अखेरपर्यंत कशिश हंस १ लाख ७६ हजार रुपये भाडे भरणार आहे. त्याचप्रमाणे ४ लाख ५० हजार सिक्युरिटी डिपॉझिट भरल्यानंतर हे घर भाड्याने घेण्यात आल्याची माहिती हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार देण्यात आली आहे. मात्र मलायकाने याबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
महत्वाच्या बातम्या-
-निरोगी राहण्यासाठी दैनंदिन आहारात प्रथिनांचा समावेश कसा कराल?
-‘आई तू कुठे आहेस, मला तुझी गरज आहे’; कठीण काळात राखीला आठवली आई, लवकरच होणार शस्त्रक्रिया…
-अभी भी दिल जवान है! भोरच्या आजोबांचा असा काही साजरा केला १११ वा वाढदिवस…
-आयफोन प्रेमींसाठी खुशखबर! आयफोनच्या ‘या’ मॉडेलवर मिळतेय 22 हजार रुपयांची सूट
-आधी धंगेकर आता भाजप अन् राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, पोलीस ठाण्याबाहेरील राडा भोवणार