Entertainment : बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिची ‘ब्युटी विथ ब्रेन’ अशीही ओळख आहे. जगातील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये ऐश्वर्या रायचे नाव आहे. १९९७ साली प्यार हो गया या चित्रपटात डेब्यू करत तिने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकलं. त्यानंतर तिने लगातार हिट सिनेमांमध्ये उत्कृष्ठ कामगिरी केल्याचे पाहिले. सर्वांची चाहती असणारी अभिनेत्री ऐश्वर्या सध्या सिनेमांमध्ये खूप कमी दिसत असली तरीही ती अद्यापही चर्चेत असते. नुकतेच तिच्या अभिषेक बच्चनसोबत घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं. अनेक जण ऐश्वर्याच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करताना कधीच थकत नाहीत. सध्या ‘द ओप्रा विन्फ्रे शो’ या मध्ये ऐश्वर्याला लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधाबाबत प्रश्न विचारला गेला. या प्रश्नावर तिने दिलेले स्मार्ट उत्तरामुळे ऐश्वर्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
भारतीय चित्रपटांमध्ये प्रेम आणि आपुलकी उघडपणे का दाखवली जात नाही? असा प्रश्न ऐश्वर्याला विचारण्यात आला होता. यावर ऐश्वर्याने अतिशय समर्पक उत्तर दिले आहे. “प्रेम ही एक खासगी भावना आहे, जी सार्वजनिक ठिकाणी दाखवण्याची गरज नाही. भारतात लोक रस्त्यावर चुंबन घेताना दिसत नाहीत आणि कलेच्या माध्यमातूनही हेच दर्शवले जाते”, असे ऐश्वर्या म्हणाली आहे.
“खरे सांगायचे तर ही चांगली गोष्ट नाही. भारतीय लोक आपल्या कुटुंबाला खूप महत्त्व देतात. कुटुंबासोबत राहणे आणि जोडीदाराच्या भावना समजून घेणे, याला भारतीय संस्कृतीत महत्त्व दिले जाते. ही या देशाची खासियत आहे. कुटुंबासोबत राहणे. एकमेकांशी जोडलेले राहणे खूप छान वाटते. आमचे आयुष्य खूप सुंदर आहे आणि आम्ही एकमेकांची खूप काळजी घेतो”, असे म्हणत ऐश्वर्याने भारतीय संस्कृती जपण्याचा संदेश दिला आहे. तिच्या या वक्तव्यामुळे तिच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘सोलापूरकर जितके दोषी तितकेच तुम्हीही’; अमोल मिटकरींनी पोलीस आयुक्तांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
-RTO: ३१ मार्चपूर्वी गाडीच्या नंबर प्लेटमध्ये करावा लागणार ‘हा’ बदल, अन्यथा…
-पुण्यात GBSच्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू; रुग्णांची संख्या 200 पार
-येरवडा-कात्रज प्रवास होणार सुसाट; ‘ट्वीन टनल’च्या निर्मितीला हिरवा झेंडा
-फर्स्ट अँड लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी मेट्रो इंटिग्रेटेड ई-बाइक फीडर सेवा ‘या’ १० स्टेशनवर सुरु