पुणे : नेहमी वादग्रस्त वक्तव्य करणारे कालीचरण महाराज यांनी आता पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. नाशिकमध्ये भद्रकाली परिसरातील साक्षी मंदिर परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कालीचरण महाराजांच्या व्याखानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना त्यांनी महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले कालीचरण महाराज?
“प्रत्येकाचे धर्माची व्याख्या वेगळी आहे. ईश्वराच्या प्राप्तीच सायन्स जीवनात धारण करणे म्हणजे धर्म होय. ईश्वराकडे सर्वाधिक श्रेष्ठ वस्तू मागितली पाहिजे. अनंत सुखानंद म्हणजेच ईश्वर सच्चिदानंद परमात्मा आहे. सगळ्या दुःखांचा पर्मनंट नाश होणार आहे. आपण शरीर नव्हे, तर आत्मा आहे. असा आनंद पाहिजे की, ज्याने दुःख झाले नाही पाहिजे. आपण आत्मा आहोत, शरीर नाही. जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या, सर्व भोगून घ्या, चांगल्या फुलाचा वास घ्या. नाकाचा सुगंध घ्या. हा सर्व आनंद संपून जाईल. मात्र ईश्वराचा आनंद संपणार नाही, असे वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले आहे. या वक्तव्यावरुन आता नवा वाद उभा राहिला आहे.
“मी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत बोलतो. पण माझे शिक्षण झालेले नाही. मी शाळा शिकलेलो नाही. अंगुठा छाप आहे. मला एक पत्रकार भेटले आणि बोलले आपण माणूस म्हणून जगू शकत नाही, ज्यात धर्म नाही तो ढोर आहे. खाणे, पिणे, झोपणे, हे पशूचे लक्षण आहे. पशू करतो तेच माणूसही करतो”, असेही कालिचरण महाराज म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे हिट अँड रन: “या प्रकरणात आमदाराचा मुलगा, २ उपमुख्यमंत्री…”; नाना पटोलेंने केले धडाधड आरोप
Benefits of soaked dates : आरोग्यासाठी खजूर वरदान! जाणून घ्या ‘हे’ चमत्कारीक फायदे
-नताशा-हार्दिकचा घटस्फोट; जवळच्या मित्राने दिली महत्वाची माहिती, ‘अनेक महिन्यांपासू दोघेही…’
-मराठ्यांचा नवा सरदार ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार
-काश्मीरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचेही भव्य स्मारक उभारणार; युवा उद्योजक पुनीत बालन यांची घोषणा