मुंबई : राज्यात लोकसभेची धामधूम संपली आता येत्या ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकालही जाहीर होणार आहे. त्यात आता विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी नव्याने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघ तसेच नाशिक मुंबई शिक्षक मतदारसंघा अशा ४ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
निवडणूक आयोगाने या आधी ही निवडणूक १० जून रोजी होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र आता विधानपरिषद निवडणुकीच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. नव्या कार्यक्रमानुसार पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहेत. तसेच १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम असा असेल
३१ मे ७ जून पर्यंत अर्ज भरणार
१० जून रोजी अर्जाची छाननी
१२ जूनपर्यंत अर्ज माघारी घेता येणार
२६ जून रोजी मतदान होणार
१ जुलै रोजी होणार मतमोजणी
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. आता, या निवडणुकीसाठी नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये, २ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. मुंबई पदवीधर मतदार संघातून विलास पोतनीस तर कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे यांची मुदत ७ जुलै रोजी संपत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Health Update | सर्दी-खोकला असताना भात खाल्ला तर काय होते? वाचा सविस्तर
-हार्दिक पांड्या-नताशाचं बिनसलं? नताशा स्टॅनकोविकचा सिनेक्षेत्राला ‘रामराम’
-Pune Hit & Run | विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ; आणखी २ गुन्हे दाखल करणार
-Health Update : कलिंगड, टरबूज खाल्ल्याने होतेय विषबाधा; खाण्यापूर्वी अशी घ्या काळजी