बारामती : बारामती लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. बारामती मतदारसंघात पहिल्यांदाच पवार कुटुंबातील २ सदस्य आमनेसामने येत निवडणूक लढत आहेत. महायुतीकडून सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे या निवडणुकीत दोन्ही उमेदवार आपापला प्रचार जोरात करताना दिसत आहेत. त्यातच आता या दोन्ही उमेदवारांच्या अडचणीत वाढणार असल्याचं दिसत आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना निवडणूक आयोगने नोटीस बजावली आहे. खर्च कमी दाखवला असून खर्चात तफावत आढळून आल्याने ही नोटीस बजावली आहे. दोन्ही उमेदवारांना दोन दिवसांत खुलासा करण्याचे सांगितले आहे. निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना नोटीस बजावली आहे.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या पहिल्या तपासणीत निवडणूक खर्चात ९ लाख १० हजाराची तफावत आढळून आली आहे. तर सुप्रिया सुळे यांच्या खर्चात १ लाख ३ हजार रुपयाची तफावत आढळली आहे. यामुळे दोन्ही उमेदवारांनी ४८ तासांत खुलासा करावा, अन्यथा उमेदवारांच्या खर्चात तफावत समाविष्ट केली जाईल, असे नोटीसीत म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अनर्थ टळला: सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश; अंधारे आणि पायलट दोघंही सुखरुप
-“पुण्याचा इतिहास आणि वारसा जपण्यासाठी मोहोळांनी केलेले काम कौतुकास्पद” – रामदास आठवले
-कोव्हिशील्ड लसीमुळे मृत्यू अटळ? ऐका ‘या’ प्रसिद्ध डॉक्टरांचं म्हणणं…
-‘…मग अनोळखी उमेदवाराला पाडण्यासाठी मोदींना का यावं लागलं?’; वाघेरेंचा बारणेंना खोचक सवाल