मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला आता न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादी फुटीनंंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि पक्षचिन्ह घड्याळ हे अधिकृतपणे अजित पवारांचे असल्याचे सांगितले होते. त्यानंतर शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकीपूर्वी तुतारी चिन्हावर निवडणूक लढली. तरीही शरद पवार गटाला लोकसभेत १० पैकी ८ जागांवर यश मिळाले.
मात्र, लोकसभा निवडणुकीत तुतारी चिन्हावरुन झालेल्या गोंधळामुळे शरद पवारांच्या पक्षाला मतांमध्ये मोठा फटका बसल्याचे सांगत शरद पवारांनी पिपाणी चिन्ह निवडणूक यादीतून हटवण्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे दाखल केली होती.
लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या तुतारी चिन्हाचा प्रभाव कमी पाडण्यासाठी विरोधकांकडून खेळण्यात आलेला डाव आता उलथून पडणार आहे. कारण निवडणूक आयोगाने शरद पवार गटाची मागणी आता मान्य केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने पिपाणी हे चिन्ह निवडणूक यादीतून हटवले आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारांच्या पिपाणी चिन्हाचा शरद पवार गटाच्या अनेक उमेदवारांच्या मताधिक्यावर मोठा परिणाम झाला. पण आता निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवार गटाला येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा बुस्टर मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pooja Khedkar: पुणे पोलिसांची पूजा खेडकरांना दुसरी नोटीस; उद्या हजर राहणार का?
-भीक नको, नोकऱ्या द्या; लाडका भाऊ योजनेवरुन ठाकरेंचे राज्य सरकारवर ताशेरे
-अजितदादांच्या शिलेदारांच्या हाती तुतारी अन् महाविकास आघाडीत वादाची ठिणगी, अमोल कोल्हेंना फटका
-महेश लांडगेंच्या पाठपुराव्याला यश; चोविसावाडी-चऱ्होली येथील कचरा स्थानांतरण केंद्र अखेर रद्द!
-नाद करा पण पोलिसांचा कुठं?; मनोरमा खेडकर महडच्या हॉटलमध्ये लपल्या होत्या, अखेर पोलिसांनी अटक केलंच