मुंबई | पुणे : राज्यात सध्या मुख्यमंत्री कोण होणार याबाबत वरिष्ठ पातळीवर बैठका सुरु आहेत. थोड्याच वेळात काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडणार आहे. फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे महायुतीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, म्हणून शिंदे गटाची भूमिका आहे तर फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत अशी भाजपची इच्छा आहे. अशातच आता कोथरुडचे आमदार, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे.
‘मुख्यमंत्रिपदावर लवकरच शिक्कामोर्तब होईल’, असा विश्वास भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. तसेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाबाबत मनाचा मोठेपणा दाखवतील आणि ते सीएम पद भाजपला देतील, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्रिपदावरील दावा मजबूत असून त्यामुळेच चंद्रकांत पाटलांनी शिंदेंनाच मन मोठं करण्याचे आवाहन केल्याचे दिसत आहे.
एकनाथ शिंदे हे आज दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे या पत्रकार परिषदेत शिंदे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. राज्यात सध्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. शिवाय मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदेंच्या वाट्याला येणार नसल्याने ते नाराज असल्याच्याही चर्चा सुरु आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-निवडणूक झाली तरीही काँग्रेसमधला वाद काही संपेना! काँग्रेस भवनात नेत्यांमध्ये नवा वाद
-‘पुण्याचे पालकमंत्री अजितदादाच’; कोणाच्या गळ्यात पडणार पालकमंत्रिपद माळ?
-पोर्शे कार प्रकरण: अपघात प्रकरणी आरोप निश्चित करण्यासाठी न्यायालयात अर्ज सादर
-‘देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत’; हेमंत रासनेंनी व्यक्त केली इच्छा
-“शिदेंना राजकारणातलं जास्त कळत असेल तर फडणवीसांना बाजूला करुन त्यांनाच मुख्यमंत्री करा”- रोहित पवार