पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघ अधिक प्रतिष्ठेचा केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत आपल्याच विचाराचा खासदार निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. यामुळे अजित पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी ही निवडणूक अधिक मनावर घेतली आहे.
मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या जोरावर जनतेच्या न्यायालयात जाण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतला आहे. त्यामुळे येत्या २ दोन मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी बारामतीत एकत्र येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
महायुतीचे हे तीनही नेते एकत्र येत असल्याने ते बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराचा नारळ फोडून करण्याची दाट शक्यता आहे. बारामती येथे अत्याधुनिक बस स्थानक उभारण्यात आले आहे. तसेच, तालुक्यातील बऱ्हाणपूर येथे पोलीस उपमुख्यालय आणि बारामती शहरात पोलीस अधिकाऱ्यांसाठी निवासस्थाने उभारण्यात आली आहेत. या विकासकामांच्या उद्घाटनासाठी महायुतीचे हे तीनही नेते बारामतीमध्ये एकत्र येणार आहेत.
बारामती मतदारसंघातून मी उभा केलेल्या उमेदवारालाच निवडून द्या. लोकसभेला एक आणि विधानसभेला एक असं मला चालणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीत माझ्या उमेदवारासोबत दगाफटका झाला, तर मी विधानसभा निवडणुकीबाबतही वेगळा विचार करेन, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बूथ कमिटी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी निर्वाणीची भाषा वापरत नागरिकांना आवाहन केले होते.
महत्वाच्या बातम्या-
-कात्रजच्या ‘क्वालिटी बेकरीत’ एक्सपायर फुडची विक्री; हिंदुत्ववादी संघटनेकडून बेकरीची तोडफोड
-Pune Drugs Racket: पुणे पोलिसांच्या धडक कारवायानंतर नाशिक पोलीस प्रशासन सज्ज
-पुण्यात इतकं ड्रग्ज सापडतंय याला गृहमंत्रीच जबाबदार; अमित ठाकरेंची फडणवीसांवर टीका
-पैसे परत केले नाही म्हणून शिवीगाळ, मानसिक त्रास; तरुणाने उचललं टोकाचं पाऊल