पुणे : महाराष्ट्रातील दहावीच्या परिक्षेला उद्यापासून (२१ फेब्रुवारी) सुरवात होत आहे. राज्यात एकूण ५ हजार १३० केंद्रावर परीक्षा सुरू होणार आहेत. परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार घडू नयेत म्हणून अनेक खबरदारीच्या उपाययोजना केल्या जातात. ज्या परीक्षा केंद्रावर मागच्या ५ वर्षात गैरप्रकार घडले अशात अशा परीक्षा केंद्रांवरील सर्व स्टाफ बदलण्याचा निर्णय राज्य मंडळांनी घेतला आहे. एकूण ५ हजार १३० केंद्रापैकी ७०१ परीक्षा केंद्रांवरील पूर्ण स्टाफ बदलण्यात आला आहे.
विभागनिहाय परिक्षा केंद्रांवरील स्टाफ बदल
पुणे विभाग एकूण परीक्षा केंद्र ६६० असून त्यापैकी १३९ परीक्षा केंद्रांवरील स्टाफ बदलला आहे. नागपूर विभागात ६७९ परीक्षा केंद्र असून १३९ परीक्षा केंद्रावरील स्टाफ बदलला आहे. छत्रपती संभाजीनगर ६४६ एकूण परीक्षा केंद्र आहेत यापैकी १५५ केंद्रांवरील स्टाफ बदलण्यात आला आहे.
मुंबई विभागात १०५५ एकूण परीक्षा केंद्र असून यापैकी १८ परीक्षा केंद्रांमधील स्टाफ बदलला. कोल्हापूर विभागात एकूण ३५७ परीक्षा केंद्र ५३ स्टाफ बदलला आहे. अमरावती विभाग ७२१ एकूण परीक्षा केंद्र असून यापैकी ९८ परीक्षा केंद्रांवरील स्टाफ बदलण्यात आला आहे.
नाशिक विभागात ४८६ एकूण परीक्षा केंद्र असून यापैकी ९३ परीक्षा केंद्रांवरील स्टाफ बदलला आहे. लातूर विभागात ४१३ एकूण परीक्षा केंद्र आहेत. त्यापैकी ५९ परीक्षा केंद्रांवरील स्टाफ बदलण्यात आला आहे. रत्नागिरी विभागात एकूण ११४ परीक्षा केंद्रातून २०१८ पासून या परीक्षा केंद्रांवर अद्याप एकही गैरप्रकार घडलेला नसल्याची माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शिवजन्मोत्सव: सरदारांकडून शिवरायांना वंदन; शिवजयंतीच्या जल्लोषाने दुमदुमली पुण्यनगरी
-मोठी स्वप्न घेऊन पुण्यात आली, पण बारामतीच्या तरुणीला ‘जीबीएस’नं गाठलं अन्…
-कोंढव्यात ‘मुस्लिम मावळा प्रतिष्ठान’कडून शिवजयंती साजरी; राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन